आणेवारीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करा
By Admin | Updated: October 29, 2014 00:25 IST2014-10-29T00:25:32+5:302014-10-29T00:25:32+5:30
आमदार सपकाळ यांचे महसूल यंत्रणेला निर्देश.

आणेवारीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करा
बुलडाणा : उशिरा आलेल्या पावसाने यावेळी शेतकर्यांचे नियोजन कोलमडून टाकले व परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे हाताशी आलेले पीकही हातातून गेले. त्यामुळे बुलडाणा मतदारसंघातील बुलडाणा व मोताळा या दोन्ही तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. अशा स्थितीत आणेवारी ही ५0 पैशाच्या आतच येणे अभिप्रेत आहे त्यामुळे महसूल यंत्रणेने आणेवारी काढण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करताना या स्थितीबाबत दक्षता घ्यावी, असे निर्देश आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले.