तालुका क्रीडा संकुलमध्ये शहरातील सर्वच वयोगटातील महिला व पुरुष सकाळी व सायंकाळी फिरण्यासाठी येतात. अनेक युवक, युवती हे पाेलीस भरती, सेना भरती यांचा सराव करण्यासाठी या मैदानावर येतात. मात्र, या मैदानात अनेक सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे सुविधा पूर्ण करण्यात याव्यात. यामध्ये प्रामुख्याने धावण्याच्या सरावासाठी व फिरण्यासाठी अशी दोन ट्रॅकची निर्मिती करण्यात यावी. अद्ययावत इनडोअर स्टेडियम व व्यायामशाळेची निर्मिती करण्यात यावी, ओपन जिमचे नूतनीकरण करण्यात येऊन जलतरण तलाव नियमित सुरू करण्यात यावा, मैदानावर नागरिकांना थकवा जाणवल्यानंतर विश्राम करण्यासाठी बाकडे उपलब्ध करण्यात यावे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, यासह प्रामुख्याने तालुका क्रीडा संकुल निवडणूक कामासाठी वापरण्यात येते असल्यामुळे नागरिक व युवकांची मोठी गैरसोय होते. नियमित व्यायाम व सरावात खंड पडतो. त्यामुळे निवडणूक कामासाठी तालुका क्रीडा संकुलाऐवजी मुकुल वासनिक सांस्कृतिक भवनचा वापर करण्यात यावा, अशी मागणी बोंद्रे यांनी या निवेदनाव्दारे केली आहे.
क्रीडा संकुलातील सुविधांची पूर्तता करा : शंतनु बोंद्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:29 IST