शेगावची विकास कामे मुदतीत पूर्ण करा

By Admin | Updated: January 8, 2015 01:15 IST2015-01-08T01:15:09+5:302015-01-08T01:15:09+5:30

विकास आराखडा बैठकीत बुलडाणाचे पालकमंत्री एकनाथ खडसे यांचे आदेश, रेल्वे मंत्रालयामुळे अडलेल्या कामांचा पाठपुरावा.

Complete development works of Shegaon in the deadline | शेगावची विकास कामे मुदतीत पूर्ण करा

शेगावची विकास कामे मुदतीत पूर्ण करा

बुलडाणा : शेगाव विकास आराखड्याची कामे अर्धवट असल्यामुळे शेगाव शहराला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. यामध्ये रेल्वेच्या प्रलंबित कामांचीही संख्या मोठी आहे. तरी शेगाव विकास आराखड्याची कामे ठरलेल्या मुदतीत पूर्ण करा, असे निर्देश पालकमंत्री एकनाथराव खडसे यांनी शेगाव विकास आराखड्याच्या बैठकीत प्रशासनाला दिले.
संत गजानन महाराजांच्या संतनगरी शेगावचा विकास करण्यासाठी शासनाने ४९६.४0 कोटी रूपयांचा विकास आराखडा तयार केला आहे. या आराखड्यामधील ६१.0३ कोटी रुपयांची कामे पूर्ण झाली असून, १२0.४३ कोटी रुपयांची कामे प्रगतीपथावर आहे. आराखड्यातील मंजूर कामे वेळर्मयादा घालून पूर्ण करावी. पूर्ण न केल्यास संबंधित अंमलबजावणी यंत्नणेवर दंडात्मक कारवाई केल्या जाईल, असा इशारा राज्याचे महसूल मंत्नी तथा जिल्ह्याचे पालकमंत्नी एकनाथराव खडसे यांनी आज दिला.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात शेगाव विकास आराखडा बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जळगाव जामोदचे आमदार डॉ. संजय कुटे, विभागीय आयुक्त ज्ञानेश्‍वर राजूरकर, जिल्हाधिकारी किरण कुरूंदकर, मुख्य अभियंता मंडपे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्यामराव दिघावकर, मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख उपस्थित होते.
आकोट रस्त्यावरील रेल्वे ओव्हर ब्रिजच्या कामाचा आढावा घेताना पालकमंत्नी खडसे यांना रेल्वेच्या प्रलंबित कामांची यादीच दिसली. पादचारी पूल, अतिरिक्त प्लॅटफार्म तसेच रखडलेल्या उड्डाण पुलामुळे होत असलेली वाहतुकीची कोंडी यामुळे त्यांनी यासंदर्भात रेल्वे मंत्री सुरेश प्रभु यांनाच थेट लक्ष घालण्याची विनंती केली. उड्डाण पुलाचे उर्वरित काम निधीमुळे बंद असल्यास पैसा उपलब्ध करून दिल्या जाईल, असेही ते म्हणाले. शेगाव शहरातील भूमिगत गटाराची खोळंबलेली कामे तातडीने पूर्ण करून नागरिकांना असुविधा निर्माण होणार नाही, याबाबत काळजी घ्यावी, असेही ते यावेळी म्हणाले.

Web Title: Complete development works of Shegaon in the deadline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.