कोरोना काळात ग्राहक मंचामध्ये दुपटीने वाढला तक्रारींचा अेाघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:05 IST2021-03-04T05:05:17+5:302021-03-04T05:05:17+5:30

एकंदरीत कायद्यातील दुरुस्तीमुळे ग्राहक मंचाचे कार्यक्षेत्र व व्याप्ती वाढली आहे. बाजारमूल्यानुसार ज्या तक्रारींचे मूल्य हे २० लाखांच्या जवळपास आहे, ...

Complaints in the consumer forum doubled during the Corona period | कोरोना काळात ग्राहक मंचामध्ये दुपटीने वाढला तक्रारींचा अेाघ

कोरोना काळात ग्राहक मंचामध्ये दुपटीने वाढला तक्रारींचा अेाघ

एकंदरीत कायद्यातील दुरुस्तीमुळे ग्राहक मंचाचे कार्यक्षेत्र व व्याप्ती वाढली आहे. बाजारमूल्यानुसार ज्या तक्रारींचे मूल्य हे २० लाखांच्या जवळपास आहे, अशा तक्रारीही येथे आता नव्या दुरुस्तीमुळे करता येत आहेत. त्यामुळे ग्राहक संरक्षण व त्यांचे हित जपण्यास एक मोठी मदत मिळत आहे. यापूर्वी १९८६ च्या कायद्यातंर्गत येथे तक्रारी दाखल होत होत्या.

--व्याप्ती वाढली--

ग्राहक मंचास आता नव्या कायद्यानुसार ग्राहक तक्रार निवारण आयोग संबोधण्यात येत आहे. सोबतच या नव्या कायदयानुसार ग्राहक मंचाची व्याप्ती वाढली आहे. द कन्झ्युमर प्राटेक्शन ॲक्ट- २०१९ नुसार हा बदल झाला असल्याचे सूत्रांनी सांगितले.

--प्रामुख्याने या तक्रारी होतात दाखल--

पीक विमा, नॅशनल इन्श्युरन्स, अेारिएनटल इन्शुरन्स, शेतकरी अपघात विमा, बियाणे कंपन्याविरोधातील दावे, इलेक्ट्रीकल आणि होम अप्लायन्ससंदर्भातील ग्राहकांच्या तक्रारी, हाऊस डेव्हलपींग संदर्भातील प्रकरणे प्रामुख्याने येथे दाखल करण्यात येतात.

२०२० मध्ये दाखल प्रकरणे :- ५०९

निकाली निघालेली प्रकरणे :- १०५

२०१९ मध्ये दाखल प्रकरणे:- २७२

निकाली निघालेली प्रकरणे:- २६७

--२०२० मध्ये दाखल प्रकरणे--

जानेवारी--४८

फेब्रुवारी:- ६०

मार्च:- ५६

एप्रिल:-००

मे-- ००

जून-- ६९

जुलै--९७

ऑगस्ट--१७

सप्टेंबर--१६

ऑक्टोबर--३२

नोव्हेंबर:- ४२

डिसेंबर:- ७२

--मिशन बिगीन अगेनमध्ये वाढल्या तक्रारी--

गेल्यावर्षी मार्चअखेर जिल्ह्यात लॉकडाऊन लागला. त्यामुळे एप्रिल, मे या महिन्यात ग्राहक मंचात एकही तक्रार दाखल झाली नाही. त्यानंतर मिशन बिगीन अगेन सुरू झाल्यानंतर ग्राहक मंचात तक्रारी दाखल होण्याचे प्रमाण वाढले.

Web Title: Complaints in the consumer forum doubled during the Corona period