वीरशैव लिंगायत समाजातील गुणवंतांचा गुणगौरव सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:39 IST2021-09-23T04:39:02+5:302021-09-23T04:39:02+5:30
२१ सप्टेंबर रोजी पलसिद्ध मठामध्ये आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वीरशैव लिंगायत समाजाचे जिल्हाध्यक्ष अनिल आवटी हे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून ...

वीरशैव लिंगायत समाजातील गुणवंतांचा गुणगौरव सोहळा
२१ सप्टेंबर रोजी पलसिद्ध मठामध्ये आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वीरशैव लिंगायत समाजाचे जिल्हाध्यक्ष अनिल आवटी हे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा परिषदेचे सभापती राजेंद्र पळसकर, सभापती निंबाजी पांडव, संजय आखाडे, डाॅ. गजानन उल्हामाले, डाॅ. संजय धाडकर, डाॅ. नरेंद्र फिसके, ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्वर चनखोरे उपस्थित होते. दीपप्रज्वलन व स्वामी पलसिद्ध महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. आयोजकांनी मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. ज्योती दीपक बुरखंडे यांंनी प्रास्ताविकेतून कार्यक्रम आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. यावेळी डाॅ. स्वप्निल अरविंद सांबपुरे, डॉ. सिद्धिविनायक राजेश आवटी, डॉ. विवेक गजानन साखळकर, डाॅ. आदर्श किशोर बुरखंडे, डॉ. समीक्षा राजेश आवटी यांचा पालकांसह स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.