रस्त्याच्या कामास प्रारंभ, नागरिकांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:34 IST2021-04-24T04:34:50+5:302021-04-24T04:34:50+5:30
ऊस उत्पादकांना मदत देण्याची मागणी बुलडाणा : मागील वर्षी लॉकडाऊन काळात रसवंती ठप्प होत्या. त्यामुळे लाखो शेतकरी व ...

रस्त्याच्या कामास प्रारंभ, नागरिकांना दिलासा
ऊस उत्पादकांना मदत देण्याची मागणी
बुलडाणा : मागील वर्षी लॉकडाऊन काळात रसवंती ठप्प होत्या. त्यामुळे लाखो शेतकरी व रसवंती चालकांना मोठी झळ पोहोचली होती. यावर्षीही कडक निर्बंधामुळे ऊस उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत़ त्यामुळे, शासनाने ऊस उत्पादकांना मदत देण्याची मागणी हाेत आहे़
काेविड सेंटरमधील तीन डाॅक्टर पाॅझिटिव्ह
लाेणार : शहरातील कोविड सेंटरमधील तीन डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे सध्या कार्यरत एकाच महिला डॉक्टर आहे. त्यामुळे त्यांच्यावर कामाचा ताण वाढला आहे. रुग्णांच्या हितासाठी आरोग्य विभागाने तातडीने आणखी डॉक्टरची नेमणूक करावी, अशी मागणी होत आहे.
विनाकारण फिरणाऱ्यांवर किनगाव पाेलिसांची कारवाई
किनगाव राजा : कोरोना महामारीमुळे सध्या राज्यात सर्वत्रच कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. तरीही काही नागरिक नियम धाब्यावर बसवून विनाकारण विनामास्क रस्त्यांवर फिरताना दिसत आहेत. अशा महाभागांवर आता किनगाव राजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सोमनाथ पवार यांनी कारवाई करण्याचा सपाटा सुरू केला आहे़
माेताळा तालुक्यात वीज चाेरी वाढली
माेताळा : तालुक्यात गत काही दिवसापासून वीज चाेरीचे प्रमाण वाढले आहे़ काही गावांमध्ये तारांवर आकडे टाकून वीज पुरवठा घेण्यात येत असल्याचे चित्र आहे़ याकडे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे़
त्या कुटुंबाला मिळाला मदतीचा हात
बुलडाणा : येळगाव जलाशयामध्ये मासेमारी करताना अरुण आनंदा किकराळे यांचा मृत्यू झाला हाेता. अरुण आनंदा किकराळे हे मच्छिमार सहकारी संस्था मर्यादित येळगाव संस्थेचे सभासद होते. त्यांच्या वारसदार यांना १६ एप्रिल रोजी १ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला़
माेताळा शहराला शुद्ध पाणीपुरवठा करा
माेताळा : मागील काही दिवसापासून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रात बिघाड झाला असल्याने शहराला अशुद्ध पाणीपुरवठा करण्यात येत आहे. शहरातील नागरिकांना नगरपंचायत प्रशासनाने शुद्ध पाणीपुरवठा करावा, अशी मागणी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने एका निवेदनाद्वारे नगरपंचायत प्रशासनाकडे केली आहे.
नारी शक्ती सन्मान पुरस्काराचे वितरण
बुलडाणा : जागतिक महिला दिनाच्या निमित्त स्टेट इनोव्हेशन ॲण्ड रिसर्च फाउंडेशन महाराष्ट्र आणि महाराष्ट्र वुमेन टीचर्स फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील सर्व जिल्ह्यात तंत्रस्नेही व उत्तम शैक्षणिक कार्य करणाऱ्या शिक्षिकांना जिल्हास्तरीय नारी शक्ती सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले़
पाेस्ट काेविड सेंटर उभारण्याची मागणी
बुलडाणा : कोरोना उपचारानंतर घरी परतलेल्या रुग्णांना निरामय आरोग्यासाठी समुपदेशन व आहार-व्यायाम बाबत मार्गदर्शनासाठी पाेस्ट काेविड सेंटर उभारण्याची मागणी हाेत आहे़ काेराेनावर मात करणाऱ्यांची संख्या माेठी आहे़ त्यामुळे, तालुकास्तरावर काेविड सेंटर उभारण्याची गरज आहे़
सिंदखेड राजात संचारबंदीचा फज्जा
सिंदखेड राजा : काेराेना संसर्ग वाढत असल्याने राज्यभरात ब्रेक द चैन अंतर्गत विविध निर्बंध लागू करण्यात आले आहेत़ मात्र, सिंदखेड राजा शहरासह तालुक्यात संचारबंदीचा फज्जा उडत आहे़ त्यामुळे, काेराेना संसर्ग राेखण्यासाठी कडक उपाय याेजना करण्याची मागणी हाेत आहे़
आगग्रस्तांना मदत देण्याची मागणी
सिंदखेड राजा : येथील तीन गाेठ्यांना आग लागल्याने माेठ्या प्रमाणात नुकसान झाले हाेते़ त्यामुळे, आगग्रस्तांना तातडीने मदत देण्याची मागणी हाेत आहे़ शेतकऱ्यांचे शेती उपयाेगी साहित्य व इतर जळाले आहेत़
पांदण रस्त्याचे काम सुरू करण्याची मागणी
सुलतानपूर : परिसरातील अनेक पांदण रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे़ पावसाळ्यात रस्त्यावर माेठ्या प्रमाणात चिखल साचत असल्याने शेतकऱ्यांना शेतमाल घरी आणण्यासाठी कसरत करावी लागते़ त्यामुळे, खरीप हंगामास सुरुवात हाेण्यापूर्वी रस्त्याची दुरुस्ती करण्याची गरज आहे़