श्रीराम मंदिर निर्माणासाठी आ. श्वेता महालेंकडून एक लाखाची देणगी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:32 IST2021-02-05T08:32:01+5:302021-02-05T08:32:01+5:30

अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्माण करण्यासाठी चिखली येथे निधी संकलित करण्यात येते आहे. यामध्ये आजवर अनेक रामभक्तांकडून निधीचे समर्पण दिले ...

Come for construction of Shriram Temple. One lakh donation from Shweta Mahalen! | श्रीराम मंदिर निर्माणासाठी आ. श्वेता महालेंकडून एक लाखाची देणगी !

श्रीराम मंदिर निर्माणासाठी आ. श्वेता महालेंकडून एक लाखाची देणगी !

अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्माण करण्यासाठी चिखली येथे निधी संकलित करण्यात येते आहे. यामध्ये आजवर अनेक रामभक्तांकडून निधीचे समर्पण दिले जात आहे. यामध्ये आमदार श्वेता महाले यांनीसुद्धा मंदिर निर्माण कार्यासाठी एक लाख रुपयांचे दान धनादेशाच्या स्वरूपात दिले आहे. या निधीचा धनादेश देताना नगर संघचालक शरद भाला, विभाग सहकार्यवाहक श्याम पारीख, विलास श्रीवास्तव, भाजप शहराध्यक्ष पंडितराव देशमुख, सुरेंद्र पांडे, कीर्ती वायकोस, नगरसेवक गोविंद देव्हडे, सुभाषअप्पा झगडे, दिलीप परसने, अंकुशराव पाटील, ऋषभ पाटील, सुरेश इंगळे यांची उपस्थिती होती.

प्रत्येक रामभक्ताने या कार्यात योगदान द्यावे : आ. महाले

श्रीराम मंदिर ही सर्व भारतीयांची अस्मिता आहे. त्यामुळे प्रत्येक श्रीरामभक्ताने शक्य तेवढी देणगी देऊन या पवित्र कार्यात सहभागी होऊन आपला खारीचा वाटा उचलावा, असे आवाहन यावेळी आ. श्वेता महाले यांनी केले.

Web Title: Come for construction of Shriram Temple. One lakh donation from Shweta Mahalen!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.