प्रगती वाचनालयात रंगले कथाकथन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:33 IST2021-02-05T08:33:16+5:302021-02-05T08:33:16+5:30
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ.अण्णासाहेब म्हळासणे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते संत तुकाराम यांच्या प्रतिमेचे पूजन ...

प्रगती वाचनालयात रंगले कथाकथन
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ.अण्णासाहेब म्हळासणे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते संत तुकाराम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रगती वाचनालयाचे उपाध्यक्ष डॉ.किसन वाघ यांनी प्रास्ताविक केले. कथाकथनकार प्रा.डॉ.बसवराज कोरे यांनी मराठी भाषेतील कथाकथनाची परंपरा विशद करून 'माझं बदलता गाव' ही कथा सभिनय सादर केली. मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त इंडियन सायकियाट्रिक सोसायटी यांच्या वतीने डॉ.महेश बाहेकर आणि डॉ.लता भोसले-बाहेकर यांच्या पुढाकाराने मराठी भाषेमध्ये काढण्यात आलेल्या मानसिक आरोग्याची दिशा दाखविणारी 'मनदर्शिका २०२१'चे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक डॉ.सदानंद देशमुख, प्रा.डॉ.यशवंत सोनवणे, डॉ.विजयाताई काकडे, प्रा.बसवराज कोरे, नरेंद्र लांजेवार, डॉ.लता भोसले-बाहेकर यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त प्रगती सार्वजनिक वाचनालयाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमास डॉ.इंदुताई लहाने, प्रा.डॉ.यशवंत सोनवणे, गणेशराव तायडे, सुरेश साबळे, प्रा.डॉ.जामेकर, पुरुषोत्तम गणगे, रविकिरण टाकळकर, शहिना पठाण, अमरचंद्र कोठारी, डॉ.राखी कुलकर्णी, वंदना ढवळे, शशिकांत इंगळे, ओम हांडे, गजानन अंभोरे, राजू हिवाळे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विदर्भ साहित्य संघ बुलडाण्याच्या सचिव वैशाली तायडे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रगती सार्वजनिक वाचनालयाचे ग्रंथपाल पंजाबराव गायकवाड यांनी आभार मानले.