महाविद्यालयाच्या टिनपत्र्याच्या खोल्या उडाल्या!

By Admin | Updated: March 3, 2016 02:10 IST2016-03-03T02:10:30+5:302016-03-03T02:10:30+5:30

वादळी वारा आठ लाखांचे नुकसान

College tin-filled rooms have been opened! | महाविद्यालयाच्या टिनपत्र्याच्या खोल्या उडाल्या!

महाविद्यालयाच्या टिनपत्र्याच्या खोल्या उडाल्या!

देऊळघाट (बुलडाणा): येथील अजिंठा मार्गावरील ईदगाह परिसरात दोन वेळा आलेल्या वादळामुळे जिल्हा परिषद हायस्कूल आणि खाजगी विज्ञान व कला महाविद्यालयाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असून, विज्ञान व कला महाविद्यालयाच्या टिनच्या संपूर्ण सहा खोल्या उडून गेल्या, तर अनेक विद्युत खांब व तार तुटल्याने देऊळघाट ग्रामस्थांना संपूर्ण रात्र अंधारात काढावी लागली.
देऊळघाट येथे १ मार्च रोजी दुपारी ४ वाजता वादळी वार्‍यासह पाऊस कोसळला. यावेळी जिल्हा परिषद हायस्कूलची १0 खोल्यांची टिनपत्रे उडून गेली होती. त्यानंतर सायंकाळी ६ च्या सुमारास याच ईदगाह परिसरात पुन्हा जोरदार चक्रीवादळ आले. त्यात खाजगी विज्ञान व कला महाविद्यालयाच्या टिनाच्या सहा खोल्या उडून गेल्या, तर ५00 मीटरच्या परिसरात शाळेचे टिन विखुरले गेले होते तसेच विज्ञान प्रयोगशाळा संगणक, डेस्कबेंच व इतर शालेय साहित्य नष्ट झाले असून, आठ लाखांचे नुकसान झाल्याची माहिती प्राचार्य सै. समीर यांनी दिली.

Web Title: College tin-filled rooms have been opened!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.