महाविद्यालयीन शिक्षकांचा मोर्चा

By Admin | Updated: July 22, 2015 23:56 IST2015-07-22T23:56:49+5:302015-07-22T23:56:49+5:30

विदर्भ ज्युनिअर कॉलेज टीचर्स असोसिएशनच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा.

College Teacher's Front | महाविद्यालयीन शिक्षकांचा मोर्चा

महाविद्यालयीन शिक्षकांचा मोर्चा

बुलडाणा : महासंघ व विजुक्टाची शिक्षणमंत्र्यांच्या झालेल्या बैठकीत प्रलंबित मागण्यांच्या संदर्भात सकारात्मक निर्णय घेतला गेला नाही. त्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांमध्ये असंतोष पसरला, यामुळे विविध मागण्यांसाठी आज विदर्भ ज्युनिअर कॉलेज टीचर्स असोसिएशनच्यावतीने २२ जुलै रोजी स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. पुढील सत्रापासून ऑनलाइन संच मान्यता करण्यात यावी, अनुदानावरील शिक्षक व अर्धवेळ शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करुन डी.सी.पी.सी.बाबत त्वरित समीक्षण करुन योग्य निर्णय घ्यावा, प्लॅन शिक्षकांचे नॉन प्लॅन वेतनामध्ये विनाविलंब रुपांतरीत करण्यात यावे, विज्ञानाच्या लेखी परीक्षेचे पूर्वीप्रमाणे दोन स्वतंत्र पेपर द्यावे, कायम शिक्षकांची अनुदानितमध्ये बदली व नियुक्ती झाल्यास त्याच वेतनश्रेणीत मान्यता द्यावी, जे.ई.ई.परीक्षा रद्द करावी, अर्धवेळ शिक्षकास त्वरित मान्यता देण्यात यावी, केंद्रीय शिक्षकांना सहाव्य वेतन आयोगाप्रमाणे वेतनश्रेणी व ग्रेडपे देण्यात याव्या, आदी मागण्या निवेदनातून जिल्हाधिकार्‍यांकडे करण्यात आल्या. या मोर्चात विज्युक्टाचे जिल्हाध्यक्ष प्रा.रामदास शिंगणे, मुजीबुर्रहमान अ.मुतलीब यांच्यासह जिल्ह्यातील संघटनेचे पदाधिकारी व सदस्य सहभागी झाले होते

Web Title: College Teacher's Front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.