शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा येथील वैद्यकीय महाविद्यालयासाठी हवे सामुहिक प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 12:35 IST

Government Medicle collage in Buldhana लोकप्रतिनिधींनी जोर लावल्यास बुलडाण्याचे शासकीय महाविद्यालय आकारात येवू शकते.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: प्रदीर्घ कालावधीपासून प्रलंबीत असलेल्या बुलडाणा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास १० आॅगस्ट रोजी डेडीकेटेड कोवीड रुग्णालयाच्या ई-लोकार्पण प्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘ग्रीन सिग्नल’ दिला असला तरी प्रत्यक्षात जमीनस्तरावर वैद्यकीय माहविद्यालयाचा प्रश्न निकाली निघण्यासाठी लोकप्रतिनिधींकडून सार्वत्रिकस्तरावर प्रयत्न होण्याची गरज निर्माण झाली आहे.चंद्रपूर येथील महिला रुग्णालयाचा वैद्यकीय महाविद्यालयासाठी वापर करण्यात येत असून पहिल्या वर्षाच्या तीन विभागाच्या बॅसेच येथे सुरू झाल्या आहेत. नंदुरबार येथेही यावर्षी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कार्यान्वीत होत आहे. त्याच धर्तीवर बुलडाण्याती वैद्यकीय महाविद्यालयासाठी लोकप्रतिनिधींनी जोर लावल्यास बुलडाण्याचे शासकीय महाविद्यालय आकारात येवू शकते. दरम्यान या महाविद्यालायस ४८५ कोटी रुपये खर्च अपेक्षीत असून कोवीडमुळे वाढलेल्या ‘सीएसआर’चा विचार करता १५ टक्के त्यात वाढ होऊ शकते, असा अंदाज बुलडाण्याचे आ. संजय गायकवाड यांनी व्यक्त केला. गेल्या शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीदरम्यान, पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, आ. गायकवाडांनी मुद्दा मुख्यमंत्र्यांकडे रेटला.तीन जागांची झाली पाहणी२०१८ मध्ये हतेडी, बोथा मार्गावरील जागा आणि बुलडाण्यातील क्षय आरोग्य धामच्या जागेची पाहणी समितीने केली होती. स्त्री रुग्णालय व क्षय आरोग्य धामची जागा योग्य असल्याचे संकेत त्यावेळी दिल्या गेले होते. तसा अहवालही पाठविण्यात आला होता. ३०० खाटांचे रुग्णालय आणि २५ ते ३० एकर जागा हे प्रमुख दोन निकष त्यावेळी निकाली निघाल्याचे सांगण्यात आले होते. वर्तमान स्थितीत ३० एकर जागा उपलब्ध करण्याबाबत आश्वस्त केले आहे.

रिइस्टीमेट करावे लागणारवैद्यक क्षेत्रातील अन्य एका अधिकाऱ्याच्यामते शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासंदर्भातील प्रस्ताव रिइस्टीमेट करावा लागणार असून सध्या मंत्रालयीन स्तरावर ही बाब आहे. त्यानंतर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयास हा प्रस्ताव पाठवावा लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासंदर्भात राज्य व केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा लागणार असून तसे आमचे प्रयत्न असल्याचे आ. संजय गायकवाड यांनी सांगितले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाDr. Rajendra Shingeडॉ. राजेंद्र शिंगणे