थंडीची चाहूल; हवेत वाढला गारवा.

By Admin | Updated: October 29, 2014 00:15 IST2014-10-29T00:15:53+5:302014-10-29T00:15:53+5:30

खामगाव शहराचे किमान तापमान २0 ते २४ अंशांच्या दरम्यान स्थिर.

Cold sink; Grew up in the air | थंडीची चाहूल; हवेत वाढला गारवा.

थंडीची चाहूल; हवेत वाढला गारवा.

खामगाव (बुलडाणा) : एरवी दिवाळीत आपल्या आगमनाची चाहूल देणार्‍या गुलाबी थंडीने आता कोठे हळूहळू आपले अस्तित्व जाणवून देण्यास सुरुवात केली आहे. सध्या शहराचे किमान तापमान २0 ते २४ अंशांच्या दरम्यान स्थिर असले, तरी गेल्या चार दिवसांत कमाल तापमानात घट झाली आहे. त्यामुळे हवेत गारवा जाणवू लागला आहे. दरम्यान, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून चांगली थंडी पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. दिवाळी आणि थंडीचे अतूट नाते आहे. दिवाळीतील पहाटेचे अभ्यंगस्नान गुलाबी थंडीच्या साक्षीनेच केले जाते. यंदाही दिवाळीपासून हवेत गारवा जाणवण्यास सुरुवात झाली असली, तरी थंडी मात्र पडलेली नाही. काही दिवसांपासून शहराच्या कमाल तापमानात मोठी घट झाल्याने गारव्यात वाढ झाली आहे. सध्या शहराचे कमाल तापमान २४ ते २८ तर किमान तापमान २0 ते २४ अंश सेल्सिअसवर स्थिर आहे. दरम्यान, सध्या नैऋत्य अरबी समुद्रावर निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे ढगाळ वातावरण निर्माण झाले असून, त्याचा थंडीच्या आगमनावरही परिणाम होत आहे; मात्र लवकरच हे वातावरण निवळून थंडी वाढण्याची चिन्हे आहेत.

Web Title: Cold sink; Grew up in the air

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.