तीन घरांसह गोठय़ाला आग

By Admin | Updated: May 26, 2014 00:20 IST2014-05-25T23:47:02+5:302014-05-26T00:20:53+5:30

मोताळा तालुक्यातील आगीच्या घटनेत हजारो रूपयांची साहित्य खाक; जीवीत हाणी नाही.

Cold fire with three houses | तीन घरांसह गोठय़ाला आग

तीन घरांसह गोठय़ाला आग

मोताळा : तालुक्यातील रामगाव तांडा येथे शनिवारी २४ मे रोजी तर पिंपळगाव नाथ येथे रविवारी २५ मे रोजी दुपार दरम्यान अचानकपणे घराला आग लागून लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. या भीषण आगीत दोन्ही गावातील तीन घरामधील गृहोपयोगी वस्तूसह एका गोठय़ातील चाराकुटार जळून खाक झाल्याची घटना घडली. रामगाव तांडा येथील राजेश कांतीलाल दळवी यांच्या घराला शनिवारी साडेबारा वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत घराचे टिनपत्र्यासह अन्नधान्ये व सर्व गृहोपयोगी वस्तू जळून खाक झाल्यामुळे दळवी कुटुुंबाचे १ ला खाचेवर नुकसान होवून हे कुटुंब उघड्यावर पडले आहे. दरम्यान दळवी यांच्या घराला लागूनच कर्तारसींग दरबारसींग गुजर यांचा गोठा होता. या आगीत कर्तारसींग यांचा गोठासुद्धा जळून खाक झाल्यामुळे त्यांचे २0 हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. तर दुसर्‍या घटनेत २५ मे रोजी रविवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास पिंपळगाव नाथे येथील जाईबाई तांबे व नारायण तांबे यांच्या दोन घरांना अचाणकपणे आग लागली. या आगीत दोन्ही घरावरील टिनपत्रे ,अन्नधान्य, गृहोपयोगी वस्तूसह एलआयसीचे बाँड, बँकेचे बाँड व जवळपास दहा हाजार रूपयाच्या नगदी नोटासुद्धा जळून खाक झाले आहे.

Web Title: Cold fire with three houses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.