सूक्ष्म सिंचनाच्या अनुदानाबाबत मुख्यमंत्र्यांनी आश्वासन पाळावे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 23:03 IST2017-08-02T23:00:41+5:302017-08-02T23:03:25+5:30

सूक्ष्म सिंचनाचे जिल्ह्यासाठी वाढीव अनुदान देण्याबरोबरच थकीत अनुदान तातडीने देण्यात यावे, अशी आग्रही मागणी सिंदखेड राजाचे शिवसेना आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी सभागृहात केली.

CM should reassure the subsidy for micro irrigation | सूक्ष्म सिंचनाच्या अनुदानाबाबत मुख्यमंत्र्यांनी आश्वासन पाळावे!

सूक्ष्म सिंचनाच्या अनुदानाबाबत मुख्यमंत्र्यांनी आश्वासन पाळावे!

ठळक मुद्देआ.डॉ. शशिकांत खेडेकर यांनी विधानसभेत उपस्थित केला मुद्दावाढीव अनुदानाबरोबरच थकीत अनुदानही तातडीने देण्यात यावेभाऊसाहेब! अजून किती प्रतीक्षा करावी लागणार?

लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : जिल्ह्यातील ठिबक व तुषार संचाचे थकीत अनुदान मिळण्याबरोबरच या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकºयांची संख्या मोठी असल्याने मंजूर अनुदान कमी पडत आहे. त्यामुळे जिल्ह्यासाठी वाढीव अनुदान उपलब्ध करून देण्यात यावे, या मागणीबाबत मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी गत हिवाळी अधिवेशनादरम्यान अधिवेशनाच्या पुढील सत्रात हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार सूक्ष्म सिंचनाचे जिल्ह्यासाठी वाढीव अनुदान देण्याबरोबरच थकीत अनुदान तातडीने देण्यात यावे, अशी आग्रही मागणी सिंदखेड राजाचे शिवसेना आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी सभागृहात केली.
विदर्भ सघन सिंचन विकास कार्यक्रम या योजनेंतर्गत शेतकºयांना ठिकब व तुषार संच खरेदीसाठी देण्यात येणारे अनुदान गत तीन वर्षांपासून कृषी विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे लालफितशाहीत अडकले आहे. याअंतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील २८ हजार १७६ शेतकºयांचे एकूण ८७ कोटी ८१ लाख रुपये शासनाकडे थकलेले आहेत. याबाबत वारंवार मागणी होत असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत आहे.
दरम्यान, ना.भाऊसाहेब फुंडकर यांच्याकडे कृषी व फलोत्पादन तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री पद आल्याने शेतकºयांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, अद्यापही शेतकºयांना अनुदान न मिळाल्याने शेतकरी अडचणीत आहेत. दरम्यान, आ.डॉ. शशिकांत खेडेकर यांनी ही बाब वारंवार विधानसभेत लावून धरली असता, विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान गत १५ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री ना.भाऊसाहेब फुुंडकर तसेच मंत्रालयातील विविध विभागाचे सर्व अधिकारी व सर्व जिल्हास्तरीय अधिकाºयांसमवेत बुलडाणा जिल्हा आढावा बैठक घेण्यात आली होती.
या बैठकीमध्ये आ.डॉ.शशिकांत खेडेकर यांनी प्रामुख्याने सूक्ष्म सिंचनाचे थकीत व वाढीव अनुदान देण्याची मागणी केली होती. त्या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी सूक्ष्म सिंचनाचे थकीत व वाढीव अनुदान अधिवेशनाच्या पुढील सत्रात देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार विधानसभा पावसाळी अधिवेशनाचे सत्र सुरू होताच, आ.डॉ. शशिकांत खेडेकर यांनी मुख्यमंत्र्यांनी गत अधिवेशनादरम्यान दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देत जिल्ह्यातील तब्बल २८ हजार १७६ शेतकरी सूक्ष्म सिंचन अनुदानाच्या प्रतीक्षेत असल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन पाळावे व शेतकºयांना दिलासा द्यावा, अशी मागणी लावून धरली.
तसेच आ.डॉ. खेडेकर यांनी कृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांना उद्देशून जिल्ह्यातील शेतकºयांचे सन २०१३-१४ व २०१४-१५ मधील सूक्ष्म सिंचनाचे थकीत अनुदान सुमारे ८७ कोटी रुपये अद्यापही न मिळाल्याने अडचणीत असलेल्या जिल्ह्यातील शेतकºयांना पालकमंत्री त्याचबरोबर कृषिमंत्री या नात्याने ना. भाऊसाहेबांनी पुढाकार घ्यावा व हा प्रश्न तातडीने सोडविण्याची विनंती केली आहे.

Web Title: CM should reassure the subsidy for micro irrigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.