खरीप अनुदानासाठी बँक व्यवस्थापकाला घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2016 01:35 IST2016-02-19T01:35:08+5:302016-02-19T01:35:08+5:30

संग्रामपूर येथील घटना; शाखा व्यवस्थापकाचे आश्‍वासन.

Closure of bank manager for kharif subsidy | खरीप अनुदानासाठी बँक व्यवस्थापकाला घेराव

खरीप अनुदानासाठी बँक व्यवस्थापकाला घेराव

संग्रामपूर (जि. बुलडाणा): खरीप अनुदानाची २0१५-१६ च्या लाभार्थ्यांंंची ३ कोटी ४४ लाख ८ हजार ८२१ रक्कम महसूल विभागाने ४ फेब्रुवारी रोजी संग्रामपूर येथील स्टेट बँक शाखेत जमा केलेली असताना अद्यापपर्यंंं तही शेतकर्‍यांच्या खात्यात जमा केलेली नाही, त्यामुळे ही रक्कम शेतकरी लाभार्थ्यांंंच्या खात्यात लवकरात लवकर वळती करा, यासाठी भाजपाचे ज्येष्ठ नेते जानरावबाप्पु देशमुख, माजी जि.प. सदस्य वासुदेव गावंडे, पंचायत समिती सभापती पांडुरंग हागे, सुभाष हागे, लोकेश राठी व अन्य १0 नागरिकांनी १८ फेब्रुवारी रोजी स्टेट बँक शाखेतील व्यवस्थापक यांना घेराव घातला. यावेळी बँक व्यवस्थापक कापसे यांच्यासोबत प्रदीर्घ चर्चा करण्यात आली, तसेच जानरावबापु यांनी खरीप अनुदानाची रक्कम तत्काळ लाभार्थ्यांंंच्या खात्यात जमा करा, असा आक्रमक पवित्रा घेतला; तसेच गरजु विद्यार्थ्यांंंना तत्काळ शैक्षणिक कर्जासाठी अडवणूक करू नका, आदी विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी आंदोलनकर्ते आक्रमक झाल्यामुळे व्यवस्थापक कापसे यांनी संबंधि त लाभार्थ्यांंंचे आजच त्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकण्यात येतील, असे आश्‍वासन दिले, तसेच बँक खातेदारासोबत व येणार्‍या कर्जदारासोबत त्यांची वागणूक चांगली नसल्यामुळे आंदोलनकत्यार्ंनी कापसे यांची चांगलीच कानउघाडणी केली. या आंदोलनामध्ये भाजपा तालुकाध्यक्ष भारत वाघ, राजू मुयांडे, संजय बोरसे आदी सहभागी झाले होते.

Web Title: Closure of bank manager for kharif subsidy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.