स्वच्छ भारत अभियानासाठी
By Admin | Updated: November 20, 2015 00:41 IST2015-11-20T00:41:05+5:302015-11-20T00:41:05+5:30
तालुक्यातील संपूर्ण गावामध्ये स्वच्छ भारत अभियान अंतर्गत येथील संवर्ग विकास अधिकारी आनंद लोकरे .....

स्वच्छ भारत अभियानासाठी
पंचायत समितीचा अभिनव उपक्रम
पोंभुर्णा : तालुक्यातील संपूर्ण गावामध्ये स्वच्छ भारत अभियान अंतर्गत येथील संवर्ग विकास अधिकारी आनंद लोकरे यांनी दिपावलीच्या पर्वावर १२ हजार शुभेच्छा कार्ड आणि १६२ पोष्टर काढून प्रत्येक गावामध्ये जनजागृती निर्माण केली. प्रत्येकांना घरी शौचालय बांधण्याचा व शौचालय बांधून वापर करीत असलेल्या व्यक्तीचा शुभ संदेशातून अभिनंदन करण्याचा अभिनव उपक्रम राबविला.
तालुक्यामध्ये सन २०१५-१६ साठी ६८७ शौचालयासाठी ८४ लाखाचा निधी प्राप्त झाला असून तालुक्यातील जास्तीत जास्त व्यक्तींकडे शौचालय व्हावे आणि शौचालय बांधलेल्या व्यक्तींनी त्याचा योग्य वापर व्हावा यासाठी पोंभुर्णाचे संवर्ग विकास अधिकारी आनंद लोकरे हे तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये संदेश देणारे शुभेच्छा पत्रक वाटले. आणि बॅनर्स गावागावामध्ये लावून संपूर्ण तालुका परिसरामध्ये जनजागृती करण्याचे अभिनव राबविला. त्यांना या कामात पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांची सुद्धा मदत मिळत आहे. कामामध्ये अतिशय वक्तशिरपणा व आपल्या कार्यात तत्पर असणारे लोकरे यांनी कामामध्ये दिरंगाई करणाऱ्या जवळपास १० कर्मचाऱ्यांवर कारवाई सुद्धा केली.
संपूर्ण पोंभुर्णा तालुका मार्च महिन्या अखेर शंभर टक्के हागणदारी मुक्त करणार असून राज्यामध्ये फक्त सात पंचायत समिती हागणदारीमुक्त असून जिल्ह्यात एकही पं.स. समिती हागणदारी मुक्त नाही. त्यामुळे पोंभुर्णा पं.स. समिती जिल्ह्यात हागणदारीमुक्त करण्याचे आपले स्वप्न असून राज्यामध्ये सुद्धा पोंभुर्णा पंचायत समितीचे नाव लौकीक करण्याचा आपला मानस असून यासाठी आपण प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदाधिकाऱ्यांना भेटून तालुका परिसर शंभर टक्के मार्च अखेरपर्यंत हागणदारीमुक्त करणार असल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (तालुका प्रतिनिधी)