दहावीचा विद्यार्थी बुलडाण्यातून बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 01:38 IST2017-11-02T01:37:41+5:302017-11-02T01:38:40+5:30

दहावीचा विद्यार्थी बुलडाण्यातून बेपत्ता
ठळक मुद्देशिकवणी वर्गाला जात असताना बेपत्ता झाला बुलडाणा पोलीस घेत आहेत शोध
बुलडाणा : दहाव्या वर्गात शिकत असलेल्या मिर्झानगरमधील काझी फैजानोद्दीन काझी नदीमोद्दीन हा मुलगा शिकवणी वर्गाला जात असताना बेपत्ता झाला आहे.
याप्रकरणी बुलडाणा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, त्याचा शोध सध्या बुलडाणा पोलीस घेत आहेत. १६ वर्षीय काझी फैजानोद्दीन हा ३0 ऑक्टोबरला शिकवणी वर्गासाठी जातो, असे सांगून घरातून निघाला होता; परंतु तो नंतर परत आला नाही.