राजूर येथे दोन गटात हाणामारी
By Admin | Updated: January 31, 2015 00:48 IST2015-01-31T00:48:52+5:302015-01-31T00:48:52+5:30
मातोळा तालुक्याम किरकोळ कारणावरून वाद, १३ जणांविरुद्ध गुन्हे दाखल.

राजूर येथे दोन गटात हाणामारी
मोताळा : शेतात खांब गाडण्याच्या कारणावरून ३0 जानेवारीच्या सकाळी ११ वाजेदरम्यान दोन गटात जोरदार हाणामारी झाल्याची घटना राजूर येथे घडली. या प्रकरणी बोराखेडी पोलिसांनी परस्परविरोधी दिलेल्या तक्रारीवरून १३ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहे. याबाबत अ. वहाब शे. अकबर (४८) यांनी दिलेल्या तकारीत नमूद केले आहे की, शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास अ. वहाब हे आपल्या शेतात गेले असता, सोमनाथ शामलाल चौबे रा. राजूर हे अ. वहाब यांच्या शेतात खांब गाडत होते. या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. दरम्यान, सोमनाथ चौबे यांनी दिपाल चौबे, मंगला चौबे, बाळू तिवारी, संतोष तिवारी, मुन्ना तिवारी, नीलम तिवारी सर्व रा. राजूर या आपल्या साथीदारांना बोलावून संगनमताने तक्रारकर्त्याला शिवीगाळ करीत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली आणि जिवे मारण्याची धमकी दिली. दोन्ही गटांच्या परस्पर तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी वरील सर्व आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.