दोन गटात हाणामारी
By Admin | Updated: October 6, 2014 23:44 IST2014-10-06T23:44:05+5:302014-10-06T23:44:05+5:30
अमडापूर येथे पुतळ्याच्या जागेवरून वाद, परस्पर तक्रारीवरून १६ जणांविरूध्द गुन्हा दाखल.

दोन गटात हाणामारी
अमडापूर (बुलडाणा) : जवळच असलेल्या हरणी येथे पुतळ्याच्या जागेचा वाद कोर्टात सुरू अस ताना एकाच समाजातील दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली. ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजेला श्रीराम धुरंधर यांचे समाधान केशव सुरडकर, आत्माराम सुरडकर, पुंजाजी सुरडकर, संदीप सुरडकर, सचिन सुरडकर, संगीता सुरडकर, उषा सुरडकर, कासाबाई सुरडकर यांनी पुतळ्याच्या जागेचा वाद कोर्टात सुरू आहे तु पुरावा देवू नको यावरून गैरकायद्याची मंडळी जमवून काठीने व लाथाबुक्याने मारहाण करून जखमी केले, अशी तक्रार शुध्दोधन श्रीराम धुरंधर (वय २५) रा.हरणी यांनी दिल्यावरून विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. त्याच प्रमाणे विरोधी गटाने केलेल्या तक्ररारीवरून देखील गुन्हा दाखल करण्यात आला.