नागरिकांचा खामगाव पालिकेवर मोर्चा!

By Admin | Updated: May 24, 2017 00:30 IST2017-05-24T00:30:59+5:302017-05-24T00:30:59+5:30

खामगाव : अनियमित पाणीपुरवठ्यामुळे त्रस्त झालेल्या केला नगर भागातील नागरिकांनी मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता पालिकेवर मोर्चा काढला.

Citizens Khamgaon! | नागरिकांचा खामगाव पालिकेवर मोर्चा!

नागरिकांचा खामगाव पालिकेवर मोर्चा!

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : अनियमित पाणीपुरवठ्यामुळे त्रस्त झालेल्या केला नगर भागातील नागरिकांनी मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता पालिकेवर मोर्चा काढला.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य पाइपलाइनला गेरू माटरगाव येथील धरणानजीक ठिकठिकाणी गळती लागली होती. या पाइपलाइनच्या दुरुस्तीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने शहराचा पाणीपुरवठा दोन दिवस बंद ठेवला होता. दरम्यान, गेल्या आठवड्यात शहराचा पाणीपुरवठा सुरळीत झाला होता; मात्र विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने, शहराच्या पाणीपुरवठ्यात खोळंबा निर्माण झाला आहे. परिणामी, शहराच्या अनेक भागातील पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडले आहे. पालिका प्रशासनाकडून पाणीपुरवठा केल्या जातो, त्यावेळी विद्युत पुरवठा खंडित राहतो. त्यामुळे महिलांना कमालीचा त्रास सहन करावा लागत असून, पालिका प्रशासनाने या समस्येवर तोडगा काढावा, या मागणीसाठी केला नगरातील महिलांनी मोर्चा काढला. या मोर्चात परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

महिला, नागरिकांची काढली समजूत!
पाणीपुरवठा होत नसल्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी थेट उपाध्यक्ष संजय मुन्ना पुरवार यांच्या दालनात धडक दिली. यावेळी आमदार आकाश फुंडकरदेखील पालिकेत उपस्थित होते. त्यावेळी आ. आकाश फुंडकरांच्या उपस्थितीतच उपाध्यक्ष संजय मुन्ना पुरवार यांनी केला नगरातील नागरिकांची समजूत काढली.

Web Title: Citizens Khamgaon!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.