पेट्रोल डिझेल गॅस दरवाढीने नागरिक हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:05 IST2021-03-04T05:05:23+5:302021-03-04T05:05:23+5:30
धामणगाव धाडः दररोज वाढत चाललेल्या पेट्रोल व डिझेलच्या किमतीने सामान्य नागरिक हवालदिल झाले असून आधीच काेरोनामुळे संकटात सापडलेल्या ...

पेट्रोल डिझेल गॅस दरवाढीने नागरिक हैराण
धामणगाव धाडः दररोज वाढत चाललेल्या पेट्रोल व डिझेलच्या किमतीने सामान्य नागरिक हवालदिल झाले असून आधीच काेरोनामुळे संकटात सापडलेल्या सामान्य नागरिकांचे या महागाईने कंबरडे मोडले आहे.
पेट्रोलने शंभरी गाठली असून स्वयंपाकाचा गॅस ही महागला आहे. त्यामुळे नागरिकांचे बजेट बिघडत चालले आहे.
प्रत्येक घरात एक दुचाकी तरी आहेच तर स्वयंपाक गॅस प्रत्येक घरात आहे. गॅस आणि पेट्रोल ही मानवाची आवश्यक गरज बनली असल्याने ती विकत घेतेच हे मोठ्या कंपन्यांना माहीत आहे. परंतु भारत देश डिजिटल होत चालला असला तरी जनता मात्र गरीबच आहे. अनेक नागरिकांना रोजगार नाही. रोजगारासाठी अनेक नागरिक आपल्याला वेळेवर पोहोचता यावे, यासाठी चाळीस-पन्नास रुपयांचे पेट्रोल टाकून काम भागवायचे आता तेवढ्या रुपयात पेट्रोल किती येईल आणि तो किती दूर जाईल असा संभ्रम निर्माण झाला आहे. स्वयंपाक करण्यासाठी आजकाल जळतण ही मिळेनासे झाले असल्याने आणि शासनाच्या धूर मुक्त मोहिमेनुसार अनेकांनी गॅस घेतला तर सरकारमार्फत गॅस उपलब्ध करून दिला. परंतु गरिबांना अजून चूल फुंकण्याची वेळ आली असल्याचे दिसून येत आहे. विदर्भात कोरोनाच्या संसर्गाची धाकधूक सुरू असून जिल्ह्याजिल्ह्यांत तिथल्या परिस्थितीनुसार पुन्हा लॉकडाऊन, जनता कफ्यू, संचारबंदी सुरू आहे. बाजाराची वेळ मर्यादित केली आहे. त्यामुळे जनतेचा जीव टांगणीला लागला असून खेड्यात जावे तर धंदा होत नाही, शहरात जावे तर खिशात दमडी नाही, अशी अवस्था नागरिकांची झाली आहे.