साथीच्या आजाराने नागरिक हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 01:04 IST2017-07-31T01:04:19+5:302017-07-31T01:04:24+5:30

सोनोशी: परिसरात नागरिकांना ताप येणे, सर्दी व जुलाब यासारख्या साथीच्या आराजाने ग्रासले आहे. त्यातच प्राथमिक आरोग्य केंद्र कित्येक महिन्यांपासून बंद असल्याने नागरिकांना कोणताही शासकीय औषधोपचार मिळत नाही.

Citizen tired viral | साथीच्या आजाराने नागरिक हैराण

साथीच्या आजाराने नागरिक हैराण

ठळक मुद्देकित्येक महिन्यांपासून सोनोशी प्राथमिक आरोग्य केंद्र बंद

लोकमत न्यूज नेटवर्क
सोनोशी: परिसरात नागरिकांना ताप येणे, सर्दी व जुलाब यासारख्या साथीच्या आराजाने ग्रासले आहे. त्यातच प्राथमिक आरोग्य केंद्र कित्येक महिन्यांपासून बंद असल्याने नागरिकांना कोणताही शासकीय औषधोपचार मिळत नाही. याकडे वरिष्ठांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
सोनोशी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र कित्येक महिन्यांपासून बंद आहे. गावात ताप व जुलाब या आजाराने थैमान घातले असून, आरोग्य सेवकासह, आरोग्य सेविका व शासकीय डॉक्टर यापैकी कोणीही भेट दिली नसून, तपासणी करण्यात येत नसल्याने नागरिकांमध्ये आरोग्य विभागाबाबत रोष व्यक्त केल्या जात आहे. गावात लहान मुलांना जास्त प्रमाणात ही लागण झाली आहे. खासगी दवाखाने फुल झाले आहेत. गावात कायमस्वरूपी आरोग्य सेविकेची नेमणूक असताना गावातील नागरिकांना आरोग्य सेविका व सेवक कधीच दिसत नाही. त्यामुळे आरोग्य विभागाचा गलथानपणा समोर येत आहे.

Web Title: Citizen tired viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.