शेतकऱ्यांकडून काेथिंबीर २५ रुपये तर ग्राहकाच्या पदरात ४० रुपयांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:37 IST2021-08-26T04:37:05+5:302021-08-26T04:37:05+5:30

बुलडाणा : गत काही वर्षांपासून विविध कारणांमुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी संकटात सापडलेले आहेत. त्यातच शेतमालाला चांगला भावही मिळत ...

Cinnamon at Rs. 25 from farmers and Rs. 40 from consumers | शेतकऱ्यांकडून काेथिंबीर २५ रुपये तर ग्राहकाच्या पदरात ४० रुपयांना

शेतकऱ्यांकडून काेथिंबीर २५ रुपये तर ग्राहकाच्या पदरात ४० रुपयांना

बुलडाणा : गत काही वर्षांपासून विविध कारणांमुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी संकटात सापडलेले आहेत. त्यातच शेतमालाला चांगला भावही मिळत नसल्याने अनेकांना लागवडीसाठी लागलेला खर्चही निघत नाही. शेतकऱ्यांकडून व्यापारी अल्पदरात भाजीपाला खरेदी करतात. ताेच भाजीपाला चढ्या दराने ग्राहकांना विक्री करीत असल्याचे चित्र आहे.

बुलडाणा तालुक्यात धाड, मासरुळ, धामणगाव धाड व इतर गावांमध्ये भाजीपाल्याचे माेठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. अनेक शेतकरी नगदी पीक म्हणून भाजीपाल्याची लागवड करतात. काेराेनामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी संकटात सापडलेले आहेत. त्यातच त्यांच्या मालाला याेग्य भावही मिळत नसल्याचे चित्र आहे. व्यापाऱी ते किरकाेळ विक्रेते शेतकऱ्यांच्या भाजीपाल्यावर माेठ्या प्रमाणात नफा कमवितात.

शेतकऱ्यांचा खर्चही निघेना...

भाजीपाला उत्पादनासाठी माेठ्या प्रमाणात खर्च येताे. काेराेनामुळे बाजार बंद असल्याने नुकसान झाले. त्यातच भाजीपाल्याला याेग्य भाव मिळत नसल्याने उत्पादन खर्चही निघत नसल्याचे चित्र आहे.

भगवान जाधव, शेतकरी

शेती मशागतीसह बियाण्यांचे दर वाढल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडलेले आहेत. त्यातच भाजीपल्याला याेग्य भाव मिळत नाही. त्यामुळे, भाजीपाला उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचे चित्र आहे.

संताेष इंगळे, शेतकरी

ग्राहकांना परवडेना

गत काही दिवसांपासून आवक घटल्याने भाजीपाल्याचे दर माेठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे, भाजीपाला घेणे परवडत नाही. पालक, वांगी, मेथीचे दर वाढल्याने विकत घ्यावा किंवा नाही असा प्रश्न पडताे.

राजू उतारे

पावसाळ्यात भाजीपाल्याचे दर नेहमी वाढतात. बाजारात आवक कमी असल्याने दर वाढले आहेत. मात्र, पर्याय नसल्याने महाग झालेला भाजीपाला विकत घ्यावा लागत आहे.

गणेश सुरडकर, ग्राहक

नफाखाेरीमुळे मिळताे भाजीपाला महाग

अनेक शेतकरी माल थेट बाजारात विक्रीसाठी आणत नाहीत. ते थेट एजंला माल विकतात. एजंटकडून शहरातील किरकाेळ विक्रेते भाजीपाला खरेदी करतात. प्रत्येक जण आपापला नफा काढत असल्याने ग्राहकापर्यंत पाेहचेपर्यंत भाजीपाला महाग हाेताे. शेतकऱ्यांना मात्र दर कमी मिळताे़

कोणत्या भाजीला काय भाव?

भाजीपाला शेतकऱ्याचा ग्राहकांना भाव मिळणारा भाव

वांगी ३० ४०

टोमॅटो २० ३०

भेंडी २० ४०

चवळी ३० ३५

पालक ५ १०

कोथिंबिर २५ ४०

कारले २० ४०

मेथी ४० ६०

हिरवी मिरची ३० ४०

पत्ताकोबी २० ४०

फुलकोबी २० ४०

दोडके ३० ४०

Web Title: Cinnamon at Rs. 25 from farmers and Rs. 40 from consumers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.