चुरस कायमच
By Admin | Updated: October 16, 2014 00:42 IST2014-10-16T00:42:25+5:302014-10-16T00:42:25+5:30
बुलडाणा विधानसभा मतदारसंघात पाच वाजेपर्यंत ५२.१९ टक्के मतदान.

चुरस कायमच
बुलडाणा : बुलडाणा विधानसभा मतदारसंघासाठी संध्याकाळी ५ वाजेपर्यंंत एकूण ५२.१९ टक्के मतदान झाले. मतदानाला सकाळी ७ वाजता सुरूवात झाल्यानंतर ११ वाजेनंतर म तदानासाठी वेग आला होता. अनेक मतदारांनी घराबाहेर पडून लोकशाहीचा आपला हक्क बजावला. संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदान केंद्रासमोर काही ठिकाणी मतदानासाठी रांगा दिसून आल्या.
शासनाच्या आदेशान्वये प्रथमच घरपोच व्होटर स्लिप देण्यात आल्यामुळे मतदारांना नाव पाहण्यासाठी अडचण आली नाही. अनेकांनी आपल्या वाहनांव्दारे थेट मतदान केंद्रावर जावून उस्फूर्तपणे मतदान केले. जिल्ह्याचे प्रथम नागरिक जिल्हाधिकारी किरण कुरूंदकर यांनी सपत्नीक जावून येथील प्रशासकीय इमारतीच्या मतदान केंद्रावर मतदान केले.
मोताळा तालुक्यातील बोराखेडी मतदान केंद्रावर सकाळी ८ वाजेदरम्यान व्होटींग मशिन बंद पडली होती. याची माहिती केंद्राधिकारी यांनी मोताळा तहसीलदार पवार यांना दिल्यानंतर काही वेळा नंतर व्होटींग मशिन सुरू करण्यात आली. बुलडाणा व मोताळा तालुक्यात संध्याकाळपर्यंंत मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.
बुलडाणा मतदारसंघ
एकूण मतदान १,४१,८८९
महिला ६८,0५९
पुरुष ७३,८३0
मतदान केंद्र २७५