दिवाळीच्या प्रकाशावर चायनाचे वर्चस्व

By Admin | Updated: October 21, 2014 23:52 IST2014-10-21T23:52:52+5:302014-10-21T23:52:52+5:30

बुलडाणा येथे पारंपारिक पणत्यासोबत लोकांचा चायनामेड दिव्याकडे कल.

Chinese supremacy in Diwali light | दिवाळीच्या प्रकाशावर चायनाचे वर्चस्व

दिवाळीच्या प्रकाशावर चायनाचे वर्चस्व

बुलडाणा : दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण. अमावस्येच्या काळ्याकुट्ट अंधार्‍या रात्रीला उजळविण्यासाठी दिवाळीला लख्ख प्रकाश करण्याचा प्रयत्न असतो. यासाठी मग मातीच्या पणतीपासून तर आकाश दिव्यांपर्यंत विविध प्रकाश साधनांचा वापर केला जातो. शहरातील बाजारपेठे विविध आकाश कंदील विक्रीस उपलब्ध आहे. मात्र नागरिक चायना आकाशकंदीलाला जास्त पसंती देत असून यंदा दिवाळीच्या प्रकाशावरही चायनाचे वर्चस्व राहणार असल्याचे चित्र आहे. शहरातील जयस्तंभ चौक, बाजार लाईन आणि कारंजा चौकात लहानमोठय़ा दुकानदारांनी रंगबिरंगी आणि आकर्षण आकाशकंदिल विक्रीस ठेवले आहे. तर ग्राहकांची काहीशी हटके आवड लक्षात घेता चायना आकाशदिपही बाजारात उपलब्ध आहे. चायनामेडमध्ये इलेक्ट्रॉनिक पणत्या १00 रुपयात २५ दिवे याप्रमाणे बाजारात आहे. तसेच लायटिंगच्या माळांमध्ये फुलांचे आकार, दिव्यांचे आकार, मंदिरांचा कळस अशा विविध आकारांमध्ये या भारतीय बनावटीच्या लायटिंग माळा ४0 रुपयांपासून ते २५0 रुपयांपर्यंतच्या किंमतीत उपलब्ध आहेत. त्यामुळे मातीपासून बनवलेले पारंपरिक पणत्यासा, चायनीज, राजस्थानी कलाकुसरीच्या, मेणाच्या पणत्या आता बाजारपेठेत ग्राहकांच्या पसंतीला उतर तांना दिसत आहे. यंदा कंदिलांचा भाव १0 ते १५ टक्कयांनी वधारला आहे. षटकोनी कंदील ३00 रुपये, करंजीचे कंदील १00 रुपये आणि छोटे मडकी कंदील १५ रुपये दराने ग्राहकांना खरेदी करावे लागणार असल्याचे विक्रेत्यांचे सांगणे आहे.

Web Title: Chinese supremacy in Diwali light

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.