चिंचपूर येथे चिमुकलीसह विवाहितेचा जळून मृत्यू
By Admin | Updated: July 10, 2015 00:05 IST2015-07-10T00:05:03+5:302015-07-10T00:05:03+5:30
मातोळा तालुक्यातील घटना; दुर्दैवी घटनेने चिंचपूर परिसरात हळहळ.

चिंचपूर येथे चिमुकलीसह विवाहितेचा जळून मृत्यू
मोताळा (जि. बुलडाणा): तालुक्यातील चिंचपूर येथील एका २५ वर्षीय विवाहितेचा स्वत:च्या चिमुकलीसह राहत्या घरात जळून मृत्यू झाल्याची घटना ९ जुलै रोजी सकाळी १0 वाजेच्या सुमारास घडली. प्राप्त माहितीनुसार चिंचपूर येथील प्रवीण पद्माकर गाडेकर (वय ३0) यांचे पाच वषार्ंपूर्वी मंगलासोबत विवाह झाला होता. लग्नानंतर २ ते ३ वष्रे हे कुटुंब पुण्यासह इतर ठिकाणी कामानिमित्त बाहेर होते. मागील दोन वर्षापासून प्रवीण गाडेकर आपली पत्नी मंगला, मुलगा अनुराग (वय ३ वर्ष) व मुलगी अनुराधा (वय सहा महिने) सह चिंचपूर गावात राहात होता. गुरूवारी ९ जुलै रोजी गावात कार्यक्रम असल्याने शेजारी व गावकरी जेवणासाठी गेले होते. दरम्यान, घरात कोणी नसताना मंगला गाडेकर आपल्या सहा महिन्याच्या चिमुकलीसह जळाली. या दुर्घटनेत सदर महिला ९0 टक्के जळाली. घटनेची माहिती होताच दोघांनाही तत्काळ बुलडाणा येथे उपचारासाठी नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. सदर महिलेचा तीन वर्षांचा मुलगा अनुराग हा सुद्धा भाजला होता; मात्र घटनेवेळी तो ओरडत घराबाहेर पडल्याने त्याचा जीव वाचल्याचे गावकर्यांनी सांगितले.