दुचाकी-ट्रॅक्टर अपघातात चिमुकल्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:03 IST2021-03-13T05:03:30+5:302021-03-13T05:03:30+5:30
तालुक्यातील मोळा येथील माधव धोटे हे दुचाकी(एमेच-१५-सीएफ-७९०४)वरून मुलगा करण व पत्नीसह मेहकरकडून मोळा गावाकडे जात होते. त्यावेळी समोरील ...

दुचाकी-ट्रॅक्टर अपघातात चिमुकल्याचा मृत्यू
तालुक्यातील मोळा येथील माधव धोटे हे दुचाकी(एमेच-१५-सीएफ-७९०४)वरून मुलगा करण व पत्नीसह मेहकरकडून मोळा गावाकडे जात होते. त्यावेळी समोरील ट्रॅक्टरचा धक्का लागल्याने करण हा दुचाकीवरून पडून ट्रॅक्टरच्या चाकाखाली आला तर माधव धोटे व त्यांची पत्नी दुसऱ्या बाजूने रस्त्यावर पडले. या अपघातामध्ये तीन वर्षीय करणचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर आ. संजय रायमुलकर यांचे स्वीय सहाय्यक विलास आखाडे, पिंटू भुजवटराव, विभाग प्रमुख अशोक पसरटे यांनी ग्रामीण रुग्णालयात जाऊन धोटे कुटुंबीयांचे सांत्वन केले. खा. प्रतापराव जाधव यांनी पोलीस प्रशासनाशी संपर्क साधून प्रकरणी दोषींवर कारवाईची मागणी केली. या प्रकरणी पोलिसानी प्रारंभिक तपासावरून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. घटनेचा पुढील तपास मेहकर पोलिस करत आहेत.