विहिरीत पडून बालकाचा मृत्यू
By Admin | Updated: July 31, 2015 23:05 IST2015-07-31T23:05:14+5:302015-07-31T23:05:14+5:30
पाय घसरल्याने विहिरीत पडून १३ वर्षीय बालकाचा मृत्यू; खामगाव तालुक्यातील घटना.

विहिरीत पडून बालकाचा मृत्यू
खामगाव (जि. बुलडाणा) : पाय घसरल्याने विहिरीत पडून १३ वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी तालुक्यातील कुर्हा पारखेड येथे घडली. सातव्या वर्गात शिकणारा मंगेश गजानन फरफट हा गुरांना पाणी पाजण्यासाठी शेतातील विहिरीवर गेला असता अचानक पाय घसरून तो विहिरीत पडला व पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.