विजेच्या धक्क्याने मुलाचा मृत्यू
By Admin | Updated: June 16, 2017 00:00 IST2017-06-16T00:00:47+5:302017-06-16T00:00:47+5:30
जलंब : नळाचे पाणी भरत असताना विजेचा धक्का लागल्याने १७ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. ही घटना आज जलंब येथे सकाळी घडली.

विजेच्या धक्क्याने मुलाचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
जलंब : नळाचे पाणी भरत असताना विजेचा धक्का लागल्याने १७ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. ही घटना आज जलंब येथे सकाळी घडली. या दुर्दैवी घडलेल्या घटनेमुळे गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
जलंब येथील रहिवासी शिवा ज्ञानदेव मुंढे (वय १७) हा मुलगा घरामध्ये नळाचे पाणी भरत असताना त्याला वायरच्या पिनचा धक्का लागल्याने विजेचा शॉक बसला. त्याला नातेवाईक व ग्रामस्थांनी तातडीने उपचाराकरिता खामगाव येथील सामान्य रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.
शिवा हा येथील श्री पाई विद्यालयामध्ये शिकत असून, यंदा तो ११ वीत उत्तीर्ण झाला असून १२ व्या वर्गात गेला होता. आई-वडिलांना तो एकटाच मुलगा होता. तसेच शिवाच्या घरची परिस्थिती ही गरिबीची असून, त्याचे आई-वडील व तो मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. शिवाच्या या दुर्दैवी मृत्यूमुळे गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.