चुकीच्या इंजेक्शनमुळे बालकाचा मृत्यू

By Admin | Updated: October 13, 2015 23:38 IST2015-10-13T23:38:53+5:302015-10-13T23:38:53+5:30

डोणगाव येथील प्रकार; तक्रार घेतल्यानंतर मृतदेहावर झाले अंत्यसंस्कार.

Child's death due to wrong injection | चुकीच्या इंजेक्शनमुळे बालकाचा मृत्यू

चुकीच्या इंजेक्शनमुळे बालकाचा मृत्यू

डोणगाव (जि. बुलडाणा): येथील एका १0 वर्षाचा मुलाचा डॉक्टरांच्या चुकीच्या इंजेक्शनमुळे मृत्यू झाल्याची तक्रार मुलाचे पालक समाधान सदार यांनी १३ ऑक्टोबर रोजी स्थानिक पोलीस स्टेशनला दिली आहे. येथील सिद्धार्थ नगरमधील समाधान महादू सदार यांचा १0 वर्षीय मुलगा ओम यास १0 ऑक्टोबर रोजी ताप आला असता, त्याला आरेगाव रोडवरील डॉ. हरिष विजय काळे या बीएएमएस डॉक्टरांनी इंजेक्शन व औषधी दिली; परंतु त्याच दिवशी रात्री ३.३0 वाजताच्या सुमारास पुन्हा ताप आल्याने १२ ऑक्टोबर पुन्हा डॉक्टरकडे आणले व ज्या ठिकाणी इंजेक्शन दिले, त्या ठिकाणी गाठ झाली व सदर जागा काळी पडली आहे, असे डॉक्टारांना सांगितले. तेव्हा त्यांनी त्या जागेवर बर्फ लावा, असे सांगून पुन्हा गोळ्या दिल्या; परंतु मुलाला घरी नेल्यानंतरही इंजेक्शनच्या जागेवरील काळे डाग व गाठ इतर शरीरावर वाढत चालल्याने मुलाला परत १२ ऑक्टोबरला डॉ. काळे यांच्याकडे उपचारार्थ आणले. त्यांनी मुलाला मेहकर येथे नेण्याचा सल्ला दिला. मेहकर येथे तपासणी करून मुलाला औरंगाबाद येथे हलविण्यात आले; मात्र डॉक्टरने तपासणी करून गॅस गँगरीनमुळे मुलाचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. सदर मुलाचा चुकीच्या इंजेक्शनमुळे मृत्यू झाल्याने मुलांच्या पालकाने औरंगाबादवरून मृतदेह सरळ डोणगाव पोलीस स्टेशनला आणून दोषी डॉक्टरवर कारवाईची मागणी केली व तोपर्यंत मृतदेह नेणार नाही, अशी भूमिका घेतली. शेवटी पालकाची तक्रार घेतल्यानंतर पोलीस स्टेशनमधून मृतदेह नेण्यात आला व अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, याप्रकरणी डॉ. काळे यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता ते भ्रमणध्वनीवर उपलब्ध झाले नाही.

Web Title: Child's death due to wrong injection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.