लोखंडी प्रवेशद्वार अंगावर पडल्याने बालकाचा मृत्यू
By Admin | Updated: June 3, 2017 00:54 IST2017-06-03T00:54:42+5:302017-06-03T00:54:42+5:30
खामगाव : लोखंडी प्रवेशद्वार अंगावर पडल्याने दबून चार वर्षीय बालकाचा करुण अंत झाल्याची दुर्दैवी घटना तालुक्यातील नागापूर येथे गुरुवारी घडली.

लोखंडी प्रवेशद्वार अंगावर पडल्याने बालकाचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : लोखंडी प्रवेशद्वार अंगावर पडल्याने दबून चार वर्षीय बालकाचा करुण अंत झाल्याची दुर्दैवी घटना तालुक्यातील नागापूर येथे गुरुवारी घडली. नागापूर येथील रहिवासी गणेश डिक्कर यांचा मुलगा प्रणव (वय ४) हा गुरुवारी अंगणात खेळत असताना लोखंडी गेट त्याच्या अंगावर पडले. त्यामुळे तो गेटखाली दबल्याने त्याची प्रकृती अत्यवस्थ झाली. त्याला नातेवाइकांनी तातडीने येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आणले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता बालक मृतावस्थेत आढळून आला. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.