शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

आता मुलांना जिल्हा परिषद शाळांचा लळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 14:13 IST

नववर्षात जिल्हा परिषद शाळांच्या गुणवत्ता विकासावर भर दिला जाणार असून जिल्हा परिषद शाळेलाही अच्छे दिन येणार आहेत.

- ब्रम्हानंद जाधव

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कॉन्व्हेंट व इतर खाजगी शाळांनाही लाजवेल असे पाऊल आता जिल्हा परिषद शाळांनी टाकले आहे. त्यामुळे काँन्व्हेंटच्या मुलांनाही जिल्हा परिषद शाळेचा लळा लागत असल्याचे चित्र दिसत आहे. जिल्ह्यातील दीड हजार शाळा डिजीटल झाल्या आहेत. आता नववर्षात जिल्हा परिषद शाळांच्या गुणवत्ता विकासावर भर दिला जाणार असून जिल्हा परिषद शाळेलाही अच्छे दिन येणार आहेत.एकीकडे जिल्हा परिषद शाळा ओस पडत असल्याची ओरड वारंवार ऐकायला मिळते. गेल्या काही वर्षात कॉन्व्हेंट व इंग्रजी माध्यमांच्या खाजगी शाळांचे जाळे खेडोपाडी पोहचले आहेत. चकाकणाऱ्या उंच इमारती, शैक्षणिक साहित्य पाहून पालकांनाही भूरळ पडत आहे. परिणामी पालक जिल्हा परिषद शाळा सोडून या खाजगी शाळांकडे वळले आहेत. काँन्व्हेंटच्या या संस्कृतीत जिल्हा परिषद शाळा टिकविण्यासाठी शिक्षण विभागाकडून अटोकाट प्रयत्न सुरू झाले आहेत. जिल्ह्यातील दीड हजार शाळा डिजीटल करण्यात आल्या आहेत. प्रयोगशील शाळांवरही भर देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी केंद्र शासन पुरस्कृत व राज्यशासन पुरस्कृत अशा विविध योजना जिल्हा परिषद मार्फत राबविल्या जातात. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये खासगी व्यवस्थापनांच्या शाळांमधून तीन हजार ४१५ विद्यार्थींनी प्रवेश घेतला आहे. जिल्ह्यातील आयएसओ शाळांचा टक्काही वाढला आहे. लोकसहभागातून शाळा ई-लनिंग करण्यात आल्या आहेत. प्रत्येक शाळेत संगणक संच आल्याने जिल्हा परिषद शाळेतील मुलांमधील संगणकाची भीती दूर झाली आहे. इंटरनॅशनल शाळांची संख्याही सहावर पोहचली आहे. डिजीटल, आयएसओ, इंटरनॅशनल शाळा, व्हीडीओच्या माध्यमातून मुलांना शिक्षण यासारखे नवनवीन बदल जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये पाहावयास मिळत आहेत. भौतीक सुविधांही मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत. या नव वर्षात शाळांच्या गुणवत्तेवर भर दिला जाणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी एजाजुल खान यांनी दिली. त्यासाठी शिक्षण विभागाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. यामध्ये नेमकी काय आखणी करणार हे नव वर्षातच स्पष्ट होईल.

 

 

 

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाEducation Sectorशिक्षण क्षेत्रSchoolशाळाStudentविद्यार्थी