लहान मुलांची तब्येत बिघडली; ओपीडीत वाढ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:39 IST2021-08-21T04:39:09+5:302021-08-21T04:39:09+5:30
लहान मुलांच्या कोरोना चाचणीकडे दुर्लक्ष लहान मुले सर्दी, खोकल्याने त्रस्त आहेत. त्यांचा तापही उतरत नाही. अशा रुग्णांच्या कोरोनाचा चाचणीकडे ...

लहान मुलांची तब्येत बिघडली; ओपीडीत वाढ!
लहान मुलांच्या कोरोना चाचणीकडे दुर्लक्ष
लहान मुले सर्दी, खोकल्याने त्रस्त आहेत. त्यांचा तापही उतरत नाही. अशा रुग्णांच्या कोरोनाचा चाचणीकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. लहान मुलांची कोरोना चाचणी करण्याची संख्या वाढविणे आवश्यक आहे.
कोरोना चाचण्या वाढविण्यासाठी आरोग्य विभागाकडून प्रयत्न करण्यात येतात. मात्र, लहान मुलांची चाचणी करण्याकडे पालकांचा कल दिसून येत नाही. वरचेवर औषधोपचार केला जात आहे.
डेंग्यू-मलेरियाची चाचणी
पावसाळ्याच्या दिवसांत डेंग्यू, मलेरियासारखे आजार वाढतात. त्यामुळे लहान मुलांना ताप आल्यानंतर डेंग्यू, मलेरियाची चाचणी करून घेणे आवश्यक आहे. लहान मुलांना न्यूमोनियासह विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. सद्य:स्थितीत बाल रुग्णालयामध्ये डेंग्यू तसेच मलेरिया व टायफाॅइडचे रुग्ण उपचार घेत असल्याचे दिसून येते.
बालरोगतज्ज्ञ म्हणतात...
सध्या ८ ते १२ वयोगटातील मुलांमध्ये डेंग्यूचे प्रमाण वाढलेले आहे. त्यानंतर सर्दी, खोकला, तापेचे रुग्ण अधिक प्रमाणात येत आहेत. काही दिवसांपासून व्हायरल ताप वाढला आहे. अशा स्थितीत पालकांनी लहान मुलांचे मच्छरांपासून संरक्षण होण्यासाठी काळजी घ्यावी. डासांचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची दक्षता घेणे या दिवसांत गरजेचे आहे. पाणी हे नियमित उकळूनच प्यावे.
-डॉ. योगिता शेजोळ, बालरोगतज्ज्ञ
ही घ्या काळजी...
१. या दिवसांत पाणी उकळूनच प्यावे. आहारावर विशेष लक्ष द्यावे, शरीरातील पाणी कमी होऊ देऊ नये.
२. कुठलाही आजार अंगावर काढू नका, तातडीने योग्य त्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
३. मच्छरांपासून लहान मुलांचा बचाव होण्यासाठी उपाययोजना कराव्यात. मच्छरदाणी वापरावी.