बालकांनी घेतला बालचित्रपट महोत्सवाचा आनंद
By Admin | Updated: August 24, 2014 00:57 IST2014-08-24T00:57:25+5:302014-08-24T00:57:25+5:30
बुलडाणा : लोकमत बाल विकास मंचचा उपक्रम

बालकांनी घेतला बालचित्रपट महोत्सवाचा आनंद
बुलडाणा : लोकमत बाल विकास मंच बाल मनाचा सच्चा सवंगडी नेहमीच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून विविध उपक्रम राबवीत असते. त्याच अनुषंगाने आज २३ ऑगस्ट रोजी बाल विकास मंचच्या नवीन सदस्यांकरीता गर्दे वाचनालयात आयोजित बाल चित्रपट महोत्सवास बच्चे कंपनीने मोठय़ा संख्येने उपस्थित राहून उस्फुर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाची सुरूवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली. त्यावेळी उमेश शर्मा, डॉ.प्रकाश अंभोरे व लोकमतचे वितरक रत्नदिप तायडे व लोकमतचे शरद गावंडे उपस्थित होते. गेल्या काही दिवसांपासून लोकमत बाल विकास मंचची सदस्यता नोंदणी सुरू असून बच्चे कंपनीकडून उत्स्फुर्त प्रतिसाद लाभत आहे. तरी सदर नोंदणी लोकमत शहर कार्यालय, डॉ.पर्हाड कॉम्प्लेक्स, संगम चौक, बुलडाणा येथे सुरू असून ज्यांनी नोंदणी केली नाही त्यांनी त्वरीत नोंदणी करून घ्यावी व सोबतच भरपूर बक्षीसे जिंका. नोंदणी शुल्क १५0 असून नोंदणी करताच वॉटर बॉटल, सक्सेस स्टोरी बुक, मोफत आईस्क्रिम कोन, मोफत दंत तपासणी, मोफत डोळे तपासणी, मोफत मॉडेलींग फोटोग्राफची कुपने मिळवा. अधिक माहितीकरीता बाल विकास मंच संयोजक योगेश पाटील ९९७0४५७७६0 वर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.