लैंगिक अत्याचारातून मुलीस गर्भधारणा

By Admin | Updated: June 1, 2015 02:03 IST2015-06-01T02:03:38+5:302015-06-01T02:03:38+5:30

गर्भपाताचा प्रयत्न; डॉक्टरसह चौघांवर गुन्हा दाखल.

Childbirth from Sexual Harassment | लैंगिक अत्याचारातून मुलीस गर्भधारणा

लैंगिक अत्याचारातून मुलीस गर्भधारणा

संग्रामपूर ( जि. बुलडाणा) : तालुक्यातील काकनवाडा येथील एका अल्पवयीन कुमारिकेवर लैंगिक अत्याचारामुळे ती कुमारी माता झाल्याची घटना घडली. तसेच या कुमारिकेचा अवैधरित्या गर्भपात करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पीडित कुमारिकेने दिलेल्या फिर्यादीवरून तामगाव पोलिसांनी डॉक्टरसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, अटक केली आहे. काकणवाडा येथील अकराव्या वर्गात शिकणार्‍या अल्पवयीन मुलीवर गावातीलच एका १६ वर्षीय तरुणासह विष्णू ऊर्फ मुन्ना बाळकृष्ण अढाव, लक्ष्मण अजाबराव कुरवाडे (वय २४) यांनी वेळोवेळी धमकी देऊन लैंगिक अत्याचार केला. यातून पीडित मुलगी गरोदर राहिल्यानंतर माळेगाव येथील डॉक्टर महादेव अढाव याने पीडित मुलीला अकोला येथील डॉ. घाटे यांच्या हॉस्पिटलमध्ये नेले; परंतु तिथे डॉक्टरांनी नकार दिल्यामुळे महादेव अढाव याने पीडित मुलीला बुलडाणा येथील एका अनाथ आश्रमात नेले व तीन महिने बेकायदेशीर ठेवून नवव्या महिन्यात शासकीय दवाखान्यात तिचे बाळंतपण करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी विष्णू बाळकृष्ण अढाव, महेश बळीराम नवलकार, लक्ष्मण अजाबराव कुरवाडे तसेच अवैधरित्या गर्भपातास सोबत करणारे डॉ. महादेव अढाव अशा चौघांविरुद्ध कलम ३७६ (२) (एन) ३१३,४५२,५0६ कलम ५ (ज) (२) ६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. तसेच विष्णू ऊर्फ मुन्ना बाळकृष्ण अढाव, लक्ष्मण अजाबराव कुरवाडे, डॉ. महादेव अढाव यांना अटक केली आहे. तर चौथा बालआरोपी असल्यामुळे त्याला वडिलांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक परदेशी करीत आहेत.

Web Title: Childbirth from Sexual Harassment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.