हॉटेलवर धाड टाकून बाल कामगार ताब्यात
By Admin | Updated: November 22, 2014 01:27 IST2014-11-22T01:27:56+5:302014-11-22T01:27:56+5:30
बुलडाणा शहरात बाल कामगार विरोधी कृती दलाची कारवाई.

हॉटेलवर धाड टाकून बाल कामगार ताब्यात
बुलडाणा : येथील इकबाल चौकातील एका हॉटेलवर २१ नोव्हेंबर रोजी बाल कामगार कृती दलाने धाड टाकून एका बाल कामगारास ताब्यात घेवून हॉटेल मालकांवर कारवाई केली. या कारवाईमुळे शहरातील हॉटेल चालकांमध्ये खळबळ उडाली आहे. बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गंत असलेल्या बाल कामगार कृती दला तील कामगार अधिकारी पी.आर. महाले, बाल संरक्षण अधिकारी शाहनवाज खान, पोलिस उपनिरिक्षक एल.डी.सोनोने, दुकान निरीक्षक राजेश बदाडे, बी.एल.राठोड, गणेश नंद्रेकर, युवराज शिंदे आदींनी शहरातील हॉटेलमध्ये बाल कामगार शोधार्थ पाहणी केली. यावेळी इकबाल चौकातील फॅमिली चिकन बिर्यानी हॉटेलमध्ये एक बाल कामगार आढळून आला. यावेळी बाल कामगार कृ ती दलाने हॉटेलवर धाड टाकून पंचनामा केला. या घटनेमुळे हॉटेल परिसरात मोठय़ा प्रमाणात गर्दी जमा झाली होती. यावेळी कृती दलातील सदस्यांनी बाल कामगारास ताब्यात घेवून शहर पोलिस स्टेशन गाठले. यावेळी संरक्षण अधिकारी शाहनवाज खान, अजीज खान यांच्या तक्रारीवरून आरोपी हॉटेल मालक मो. युनुस मो. मुसा वय ३१ रा. बुलडाणा याच्या विरूध्द भादंवि ३७४ तसेच बाल न्याय अधिनियम २000/२00६ च्या नियमान्वये २३, २६ नुसार गुन्हा दाखल केला. तसेच बाल कामगारास बाल सुधार गृहात दाखल करण्यात आले आहे. याप्रकणातील आरोपी हॉटेल मालक फरार झाला आहे.