मनसगाव येथील बालक बेपत्ता
By Admin | Updated: July 31, 2014 01:29 IST2014-07-31T01:00:40+5:302014-07-31T01:29:16+5:30
पुर्णा नदीच्या पुरात वाहुन गेल्याची शंका.

मनसगाव येथील बालक बेपत्ता
शेगाव: शेगाव येथील दवाखान्यात आलेल्या मनसगाव येथील १५ वर्षीय बालक अद्याप घरी परतला नसून तो पुर्णा नदीच्या पुरात वाहुन गेल्याची शंका व्यक्त केली जात आहे. या बाबत महसुल विभाग नागरीकांच्या मदतीने बालकाचा शोध घेत आहे. काल मंगळवारी मनसगाव येथील पवन शामराव पवार, वय १५ हा आपल्या नातेवाईकांसोबत शेगाव येथे रुग्णालयात आला होता. काकांनी रुग्णालयाचे काम झाल्यानंतर त्याला मनसगावकडे जाणार्या वाहनात बसवुन देवून घरी जाण्यास सांगितले मात्र पवन हा सायंकाळपर्यंत घरी पोहचला नाही.याबाबत नातेवाईकांनी शोधाशोध केली असता भोन, ता. संग्रामपूर येथील एका इसमाने पुर्णा नदीच्या खातखेड गावाकडील पात्रात एक मुलगा पाण्यात पडतांना बघीतला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहीती तहसिलदार डॉ. रामेर्श्वर पुरी यांना मिळताच त्यांनी आपल्या पथकासह घटनास्थळ गाठुन मनसगाव येथील सुर्योदय ग्रुप व पट्टीच्या पोहणार्यांची मदत घेवून शोधाशोध केली मात्र तो मिळुन आला नाही. बुधवारी सुर्योदय ग्रुपच्या युवकांनी मनसगाव ते जीगांव या दरम्यान नदीकाठाची पाहणी केली.