शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

चिखलीत नवीन राजकीय समीकरणाची नांदी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 00:42 IST

चिखली : शिवसेनेच्या केंद्रीय कार्यकारिणीत बुलडाणाचे तत्कालीन संपर्क प्रमुख तथा खासदार आनंदराव अडसूळ यांची शिवसेना नेतेपदी निवड झाल्यानंतर त्यांनी आपल्या बुलडाणा जिल्हा दौर्‍यादरम्यान जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रा.नरेंद्र खेडेकर यांच्या निवासस्थानी दिलेली भेट सध्या चिखलीतील राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे. खा.अडसूळांची ही भेट चिखलीतील नवीन राजकीय समीकरणांची नांदी ठरण्याची चिन्हे आहेत.

ठळक मुद्देआनंदराव अडसूळांची नरेंद्र खेडेकर यांच्या निवासस्थानी भेट

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : शिवसेनेच्या केंद्रीय कार्यकारिणीत बुलडाणाचे तत्कालीन संपर्क प्रमुख तथा खासदार आनंदराव अडसूळ यांची शिवसेना नेतेपदी निवड झाल्यानंतर त्यांनी आपल्या बुलडाणा जिल्हा दौर्‍यादरम्यान जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रा.नरेंद्र खेडेकर यांच्या निवासस्थानी दिलेली भेट सध्या चिखलीतील राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे. खा.अडसूळांची ही भेट चिखलीतील नवीन राजकीय समीकरणांची नांदी ठरण्याची चिन्हे आहेत.एकेकाळी परिसरातील आणि जिल्हय़ातीलही शिवसेनेची बुलंद तोफ असा लौकिक असलेले तत्कालीन जिल्हाप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर यांनी चिखली विधानसभा मतदार संघातील काही राजकीय समीकरणांना कंटाळून शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत काँग्रेसचा झेंडा हाती घेतला होता. त्यातही काँग्रेसचे अ.भा.महासचिव मुकुल वासनिक यांचे निकटवर्तीय म्हणून प्रा.खेडेकरांनी जिल्हा परिषदेत आधी सभापतीपद आणि नंतर अध्यक्षपद पदरात पाडून घेतले होते; मात्र गेल्या काही दिवसांपासून प्रा. खेडेकर यांच्या राजकीय जीवनाचा केंद्रबिंदू असलेल्या चिखली विधानसभा मतदार संघातील राजकीय चित्र आणि समीकरणे याचा विचार करता आता काँग्रेसमध्ये प्रा.नरेंद्र खेडेकरांचे मन रमेना की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, गत काही महिन्यांपासून प्रा. खेडेकर यांचे सोशल मीडियावर शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतची तसेच प्रा. खेडेकर जिल्हाप्रमुख असतानाची छायाचित्रे व्हायरल होत असल्याने प्रा. खेडेकर यांच्यातला शिवसैनिक अद्यापही जागा असल्याची चर्चा आणि त्यानुसार प्रा. खेडेकर यांच्या आगामी राजकीय प्रवासाबाबतची अटकळे राजकीय वर्तुळात बांधली जात होती. अशातच शिवसेनेच्या केंद्रीय कार्यकारिणीत शिवसेनेच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर खा. आनंदराव अडसूळ यांचे एका खासगी सोहळय़ानिमित्ताने चिखलीत आगमन झाले असता, त्यांचे प्रा. नरेंद्र खेडेकर यांच्या निवासस्थानी झालेले जंगी स्वागत व सत्काराने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, प्रा. खेडेकर यांची खा. प्रतापराव जाधव, खा. अडसूळ यांच्यासह शिवसेना नेत्यांशी वाढत्या जवळीकीने भविष्यातील राजकीय समीकरणाचे चित्र हळूहळू स्पष्ट होत चालले असून, येत्या काळात चिखली विधानसभा मतदार संघाच्या राजकारणात अनेक राजकीय भूकंप होण्याची चिन्हे सध्या दिसून येत आहेत. सद्यस्थितीत शिवसेनेलाही चिखलीत एका दमदार नेतृत्वाची गरज असल्याने प्रा. नरेंद्र खेडेकर नेमकी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांच लक्ष लागले आहे.  

टॅग्स :Anandrao Adsulआनंदराव अडसूळbuldhanaबुलडाणा