चिखलीत गोदामास आग; लाखो रुपयांच्या वस्तू खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2016 02:00 IST2016-04-20T02:00:20+5:302016-04-20T02:00:20+5:30
जीवित हानी नाही; नागरिकांनी दाखवली सतर्कता

चिखलीत गोदामास आग; लाखो रुपयांच्या वस्तू खाक
चिखली (जि. बुलडाणा): येथील बगाडिया परिसरातील बांबूपासून निर्मित झाडू व इतर साहित्याच्या गोडाउनला आग लागल्याने सुमारे साडेचार लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना १९ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास घडली.
स्थानिक बगाडिया परिसरात शोभा सौंदरकर यांनी आपल्या गोडाउनमध्ये बांबूपासून निर्मित झाडू, सूप, फडे, दुरडी व इतर साहित्य साठवून ठेवले होते. दरम्यान, सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास या गोडाउनला आग लागल्याने यामध्ये सुमारे साडेचार लाख रुपयांचे साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या आगीची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मिळेल त्या साधनाने आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. दरम्यान, चिखली नगर परिषदेच्या अग्निशामक दलाने घटनास्थळी दा खल होऊन पाण्याचा मारा केल्याने आगीवर नियंत्रण मिळविता आले; मात्र तत्पूर्वी गोडाउनमधील बांबूपासून निर्मित सर्व साहित्य जळून खाक झाल्याने सुमारे साडेचार लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. नागरिकांच्या सतर्कतेने वित्तहानी वगळता या आगीत इतर अनुचित घटना घडली नाही.