चिखली पंचायत समितीत रंगले ‘खुर्ची’ नाट्य!

By Admin | Updated: June 23, 2016 23:33 IST2016-06-23T23:33:50+5:302016-06-23T23:33:50+5:30

काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; सभापतींचा राजीनामा कळीचा मुद्दा.

Chikhli panchayat committee plays 'churachi' drama! | चिखली पंचायत समितीत रंगले ‘खुर्ची’ नाट्य!

चिखली पंचायत समितीत रंगले ‘खुर्ची’ नाट्य!

चिखली (जि. बुलडाणा): चिखली पंचायत समितीमध्ये सभापती पदाच्या राजीनाम्यावरून बर्‍याच दिवसांपासून काँग्रेस अंतर्गत सुरू असलेली धुसफूस आज चव्हाट्यावर येऊन मासिक सभेच्या निमित्ताने त्याचा स्फोट पहावयास मिळाला. सभापतींप्रमाणेच सदस्यांनाही व्हील चेअर द्या, अशी मागणी करत खुर्चीच्या आडून थेट सभापतींच्या राजीनाम्यासाठी धुमसत असलेला असंतोष सदस्यांनी सभापतीच्या दालनातील खुर्ची बाहेर फेकून देत व्यक्त केला व सभात्याग केल्याने पंचायत समितीची मासिक सभा चांगलीच चर्चेत आली आहे.
यासंदर्भात सविस्तर असे की, चिखली पंचायत समितीमध्ये काँग्रेसचे एकहाती वर्चस्व असल्याने सभापतीपदासाठी इच्छुकांची संख्या लक्षात घेता सव्वा वर्षांच्या आवर्तन पद्धतीनुसार सभापतीपदाचा कार्यकाळ काँग्रेस सुप्रिमो आमदार राहुल बोंद्रे यांनी वाटून दिला आहे. त्यानुसार वर्षभरापूर्वी सविता वाघमारे यांनी सभापतीपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्या जागी युवक काँग्रेसचे जिल्हा महासचिव राम डहाके यांच्यर पत्नी सत्यभामा डहाके यांची वर्णी लागली आहे. दरम्यान, एका वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांना आ.बोंद्रे यांनी राजीनामा देण्याचे आदेशीत केले असता, डहाके यांनी तो आदेश साफ धुडकावून लावला आहे.

Web Title: Chikhli panchayat committee plays 'churachi' drama!