चिखली पंचायत समितीत तोडफोड
By Admin | Updated: June 7, 2014 00:18 IST2014-06-06T23:50:49+5:302014-06-07T00:18:02+5:30
पाणी प्रश्न पेटला : संतप्त सदस्यांनी केली वॉटर फिल्टरची तोडफोड

चिखली पंचायत समितीत तोडफोड
चिखली : पंचायत समितीत येणार्या ग्रामीण जनतेसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याबाबत ठराव घे तल्यानंतर अत्यंत हलक्या दर्जाचे वॉटर फिल्टर लावल्याप्रकरणी मासिक सभेत जाब विचारल्यानंतर समाधानकारक उत्तर न मिळाल्याने संतप्त पं.स. सदस्यांनी पंचायत समितीत बसविलेल्या वॉटर फिल्टरची तोडफोड केली.
याबाबत असे की, चिखली पंचायत समितीमध्ये येणार्या नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे या हेतूने पं.स. सदस्यांनी समिती आवारात वॉटर फिल्टर बसविण्यासाठी एकमताने ठराव पारित केला होता. त्यानुसार पं.स. आवारात बसविण्यात आलेले वॉटर फिल्टर अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून, त्यातून पाणी फिल्टरच होत नाही, काही दिवसांपूर्वी फिल्टर झालेल्या पाण्यात जंतू आढळून आले होते. ही बाब संबंधित अधिकार्यांच्या लक्षा तदेखील आणून देण्यात आली होती; परंतु या बाबीकडे गांभीर्याने पाहिले न गेल्याने पं.स. सदस्यांमध्ये रोष व्यक्त होता. उलटपक्षी गटविकास अधिकारी राजपूत हे स्वत:च्या कक्षामध्ये खासगी विक्रेत्यांकडून आर.ओ. वॉटरची कॅन विकत घेतात व सर्वसामान्य जनतेसाठी मात्र निकृष्ट दर्जाचे वॉटर फिल्टर बसवून वेळ मारून नेत असल्याचा आरोप पं.स. सदस्यांकडून होत आहे. दरम्यान, ६ जून रोजी मासिक सभा आयोजित करण्यात आली होती; मात्र दुपारी १ वाजेपर्यंत मिटिंग हॉल उघडल्या गेला नाही.
गटविकास अधिकार्यासह इतर अधिकारी व कर्मचारीदेखील अनुपस्थित असल्याने पं.स. उपसभापती भानुदास घुबे व मनसे सदस्य विनोद खरपास आदींनी याबाबत विचारणा केली असता. गटविकास अधिकार्यांचा प्रभार कृषी अधिकारी मेरत यांच्याकडे असल्याचे समजले. मासिक सभा असताना गटविकास अधिकारी गैरहजर कसे, असा प्रश्न उपस्थित करून आता मासिक सभेत कोणत्या समस्यांची सोडवणूक होणार, उत्तरे कोण देणार? असे सवाल करीत उपसभापती घुबे यांनी मासिक सभेचे हजेरी रजिस्टर फाडले व हलक्या दर्जाचे असलेले वॉटर फिल्टरची तोडफोड केली. यावेळी सभापती प्रा. माधुरी देशमुख, पं.स. सदस्या संगीता पाटील, कोकिळा परिहार, सविता वाघमारे, विमल लहाने, ज्योती सीताफळे आदी महिला सदस्यांसह राजू पाटील, समाधान पाटील, देवानंद खरात, राम डहाके, लक्ष्मण अंभोरे उपस्थिती होते.