शहरं
Join us  
Trending Stories
1
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
2
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...
3
भयंकर! एम्समधील नर्सच्या दोन मुलांना घरात घुसून जिवंत जाळले, आईचा आक्रोश
4
चीनने पाकिस्तानला भेट दिली रस्त्यावरून धावणारी मेट्रो, रुळांची गरजच नाही, अशी आहेत आणखी वैशिष्ट्ये
5
IND vs ENG : कमनशिबी कॅप्टन! किंग कोहलीनंतर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलवर आली ही वेळ
6
भारताचा विकास रोखण्याचा प्रयत्न; ट्रम्प यांनी भारतीय कंपन्यांवर लादलेल्या निर्बंधांमुळे इराण संतापला
7
अर्ध वर्षं संपलं, पण अर्धं तर बाकी आहे! 'या' सवयी बदला- डिसेंबर २०२५ पर्यंत बदलेल जगणं
8
'आयुष्मान भारत योजना फसवी' मुंबईतील महिलेची सरकारी योजनेवर टीका, सांगितला धक्कादायक अनुभव
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनमानी कारभारावरून अमेरिकेत गोंधळ; राष्ट्रपतींच्या टॅरिफ पॉवरवर न्यायालय आज निर्णय देणार
10
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
11
मालेगाव बॉम्ब स्फोट: "तपास यंत्रणा शंकेपलीकडे आरोप सिद्ध करू शकत नसतील, तर..."; खासदार देसाई काय बोलले?
12
August Horoscope 2025: ऑगस्टमध्ये 'या' ६ राशींच्या वाट्याला येणार राजसी थाट; बाकी राशींचे काय?
13
हिंदूही दहशतवादी असू शकतात! मालेगाव निकालानंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ महिला नेत्यानं मांडलं स्पष्ट मत 
14
पाकिस्तानशी मोठी डील करून डोनाल्ड ट्रम्प यांचा दुहेरी निशाणा; भारतासह चीनलाही दिला संदेश?
15
औषधांचा साठा संपला, उपकरणांमध्येही बिघाड; कुर्ला येथील भाभा रुग्णालयातील रुग्णांचे हाल!
16
बाजारात मोठी घसरण! निफ्टी अडीच टक्क्यांहून अधिक खाली, अदानी-टाटांना सर्वाधिक फटका
17
२५% टॅरिफवर भडकले भारतीय व्यावसायिक; कोणी दिला ट्रम्प यांना अमेरिकन सामानावर बहिष्काराचा इशारा?
18
IPL 2026: केएल राहुल बनणार कर्णधार, २५ कोटीही मिळणार? 'या' संघाबद्दल रंगलीये चर्चा
19
मालेगाव बॉम्ब स्फोट: निकालावर सरसंघचालक भागवत यांनी तीन शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले...
20
व्हॉट्सअपवरील विनाकामाचे फोटो अन् व्हिडिओंनी भरला फोन, ही ट्रिक वापरून पहा; गॅलरी रिकामी राहील

चिखलीचे आमदार राहुल बोंद्रेंना कार्यकर्त्यांसह अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 13:49 IST

पोलीस स्टेशनवर झालेली दगडफेक प्रकरणात पोलिसांनी आमदार राहुल बोंद्रेंसह दोन्ही पक्षाच्या २२९ जणांवर शासकीय मालमत्ता नुकसानीसह विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली: चिखली पोलीस स्टेशनमध्ये गत २२ फेब्रुवारी रोजी काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झालेला राडा आणि यातून पोलीस स्टेशनवर झालेली दगडफेक प्रकरणात पोलिसांनी आमदार राहुल बोंद्रेंसह दोन्ही पक्षाच्या २२९ जणांवर शासकीय मालमत्ता नुकसानीसह विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले होते. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांकडून अटकसत्र राबविण्यात येत आहे. याअंतर्गत ३ मार्च रोजी दुपारी ४ वाजता स्थानिक अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयातून आ. राहुल बोंद्रेंना पोलिसांनी अटक केली.तालुक्यातील धोत्रा भणगोजी जि. प. शाळेत २२ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या कार्यक्रमात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. राहुल बोंद्रे व भाजपच्या जि. प. महिला व बालकल्याण सभापती श्वेता महाले यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली होती. त्याचे पडसाद शहरात उमटले आणि भाजप व काँग्रेसच्या दोन्ही गटात स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये राडा झाला होता. तसेच जमावाने पोलिसांवर दगडफेक केल्याने चार पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. हा जमाव पांगविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला होता. दरम्यान, याप्रकरणी पीएसआय मोहन पाटील यांच्या फिर्यादीवरून आ. राहुल बोंद्रे यांच्यासह दोन्ही गटाच्या २२९ जणांवर भादंविच्या कलम १४३, १४५, १४७, १४८, १४९, ३५३, ३३२, ४२७, २९४, कलम ३ सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक अधिनियम, १३५ मुंबई पोलीस अधिनियमानुसार गुन्हा दाखल केल्यानंतर या प्रकरणात सचिन बोंद्रे व राहुल सवडतकर यांना अटक केली होती. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांना हव्या असलेल्या आ. राहुल बोंद्रेंसह दोन्ही गटातील इतर कार्यकर्त्यांसाठी पोलिसांनी अटकसत्र राबविणे चालविले होते. दरम्यान, प्रकरणात आरोपी असणारे आ. राहुल बोंद्रे यांनी ३ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता आत्मसमर्पण करण्याची घोषणा केली होती; मात्र त्यापूर्वीच चिखली पोलीस निरीक्षक गुलाबराव वाघ यांनी दुपारी ४ वाजता स्थानिक अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरातून आ. बोंद्रे व त्यांच्या सहकाऱ्यांना ताब्यात घेतले. त्यावेळी अभियांत्रिकी महाविद्यालय परिसरात मोठा जमाव जमला होता. पोलिसांनी मोठ्या शिताफीने आ. बोंद्रे यांना आपल्या गाडीत बसवले व इतर कार्यकर्त्यांना दुसऱ्या वाहनाने चिखली पोलीस स्टेशनला आणले. दरम्यान, आ. बोंद्रे यांना बुलडाणा येथे पुढील तपासासाठी नेण्यात आले असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक संदीप डोईफोडे यांनी दिली. या पृष्ठभूमीवर चिखली पोलिसांनी शहात ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता, तर अपर पोलीस अधीक्षक डोईफोडे, अपर पोलीस अधीक्षक महामुनी, स्थानिक गुन्हे शाखा अधीक्षक महेंद्र देशमुख यांच्यासह चिखली पोलीस निरीक्षक गुलाबराव वाघ परिस्थितीवर नियंत्रण मिळवून आहेत. (तालुका प्रतिनिधी) २२९ कार्यकर्त्यांवर गुन्हेया प्रकरणात चिखली पोलिसांनी काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षाच्या २२९ कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहे. यामध्ये आ. राहुल बोंद्रे यांच्यासह डॉ. सत्येंद्र भुसारी, प्रदीप पचेरवाल, डॉ. मोहम्मद इसरार, रफीक कुरेशी, नंदू सवडतकर, पप्पू देशमुख, किशोर कुहिटे, मो. आसीफ मो. शरीफ, रमेश सुरडकर, विठ्ठल साळोख, लक्ष्मण अंभोरे, योगेश देशमुख, किशोर साळवे, प्रदीप साळवे, खलील बागवान, सचिन शिंगणे, गजानन परिहार, राम जाधव, दीपक खरात, योगेश जाधव यांना अटकदेखील केली असून, रात्री उशिरापर्यंत अटकसत्र सुरूच असल्याने ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाRahul Bondreराहुल बोंद्रेcongressकाँग्रेस