चिखली अर्बनच्या उपक्रमामुळे मृत खातेदारांच्या वारसांना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:14 IST2021-09-02T05:14:09+5:302021-09-02T05:14:09+5:30
दि चिखली अर्बनच्या शेंदूर्जन शाखेचे खातेदार दिनकर एकनाथ शिंगणे यांचे २८ मार्च २०२१ रोजी, तर अंबाशी येथील चिखली शाखेचे ...

चिखली अर्बनच्या उपक्रमामुळे मृत खातेदारांच्या वारसांना मदत
दि चिखली अर्बनच्या शेंदूर्जन शाखेचे खातेदार दिनकर एकनाथ शिंगणे यांचे २८ मार्च २०२१ रोजी, तर अंबाशी येथील चिखली शाखेचे बँकेचे खातेदार संतोष खंडागळे यांचे २० मार्च २०२१ रोजी अपघाती निधन झाले आहे. अशा परिस्थितीत चिखली अर्बन बँकेची अपघात विमा योजना मृत खातेदारांच्या कुटुंबीयांसाठी मोठा आधार ठरली आहे. बँकेने मृत्यूसंबंधीच्या सर्व आवश्यक बाबींची पूर्तता करून विमा कंपनीकडे पाठपुरावा करून प्रत्येकी दोन लाख रुपयांचा अपघात विमा मंजूर करून घेतला आहे. दरम्यान, मंजूर अपघात विम्याचा धनादेश बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त यांच्या हस्ते मृत दिनकर शिंगणे यांचे वारसदार लता शिंगणे, तर मृत संतोष खंडागळे यांच्या वारसदार गोदावरी खंडागळे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम दिवटे, बँकेचे संचालक मनोहरराव खडके, राजेंद्र शेटे, विश्वनाथअप्पा जितकर, शैलेश बाहेती, सुशील शेटे, आनंद जेठाणी, संचालिका सुनीता भालेराव, बँकेचे सरव्यवस्थापक संजय भंगिरे यांची उपस्थिती होती. (वा.प्र.)