चिखलीने आणखी एक सुपुत्र गमावला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:41 IST2021-09-08T04:41:34+5:302021-09-08T04:41:34+5:30

लष्करी कर्तव्य बजावताना जवान श्याम शिंदे यांना वीरमरण ! चिखली : येथील जुने गाव परिसरातील श्याम प्रकाश शिंदे (वय ...

Chikhali loses another son! | चिखलीने आणखी एक सुपुत्र गमावला !

चिखलीने आणखी एक सुपुत्र गमावला !

लष्करी कर्तव्य बजावताना जवान श्याम शिंदे यांना वीरमरण !

चिखली : येथील जुने गाव परिसरातील श्याम प्रकाश शिंदे (वय ३५) यांना लष्करी कर्तव्य बजावताना लुधियाना येथे वीरमरण प्राप्त झाले आहे. शहराने गत महिन्यातच शहीद जवान कैलास पवार यांच्या रूपाने एक सुपुत्र गमावला आहे. त्यापाठोपाठ शहराने आणखी एक जवान गमावल्याची वार्ता शहरात पसरताच हळहळ व्यक्त होत आहे.

स्थानिक जुने गाव परिसरातील अंधारा महादेव मंदिर परिसरातील श्याम प्रकाश शिंदे लष्करी दलात सेवारत होते. लुधियाना येथे ते कार्यरत होते होते. ७ सप्टेंबर रोजी सकाळी परेड झाल्यानंतर त्यांना आकस्मिक चक्कर आल्याने ते जागेवरच कोसळले आणि तेथेच त्यांचे निधन झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. कर्तव्य बजावताना आकस्मिकपणे वीरमरण आलेले जवान श्याम शिंदे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, मोठा भाऊ असा बराच मोठा आप्त परिवार आहे. लष्कारी औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर स्व. श्याम शिंदे यांच्या पार्थिवावर चिखली येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Web Title: Chikhali loses another son!