शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

चिखली : अज्ञात वाहनाच्या धडकेत युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 01:14 IST

चिखली : एका प्रवासी अ‍ॅपेने चिखलीकडे येत असताना अज्ञात वाहनाने कट मारल्याने अ‍ॅपेतून खाली पडून गंभीर जखमी  युवकाचा मृत्यू झाल्याची घटना २७ एप्रिल रोजी घडली. 

ठळक मुद्देअज्ञात वाहनाने कट मारल्याने अ‍ॅपेतून खाली पडून गंभीर जखमी

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : एका प्रवासी अ‍ॅपेने चिखलीकडे येत असताना अज्ञात वाहनाने कट मारल्याने अ‍ॅपेतून खाली पडून गंभीर जखमी  युवकाचा मृत्यू झाल्याची घटना २७ एप्रिल रोजी घडली. या अपघातात मृत्यू पावलेला युवक शे. अलीम शे.सलीम रा. आनंदनगर चिखली हा २७ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास एका प्रवासी अ‍ॅपे वाहनातून अ‍ॅपे क्र. एमएच २८ एच ४३१६ ने मेरा बु. येथून चिखलीकडे येत असताना चिखली-दे.राजा रोडवरील हनुमान मंदिराजवळ एका अज्ञात वाहनाने अ‍ॅपेस कट मारल्याने या अ‍ॅपेत बसलेल्या शे.अलीम शे.सलीम यास पायाजवळ गुप्तांगास जबर मार लागून तो अ‍ॅपेतून खाली पडला. याबाबत शे.शकील रशिद रा.मेरा बु. यांनी दिलेल्या माहितीवरून अन्वरशहा अकबरशहा व नगरसेवक मो.आसिफ यांनी त्यास गंभीर जखमी अवस्थेत स्थानिक ग्रामीण रुग्णालयात आणले; मात्र त्याची स्थिती गंभीर असल्याने त्यास बुलडाणा येथे रेफर करण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकाºयांना दिला; परंतु वेळ कमी असल्याने त्याच्या नातेवाइकांनी त्यास प्रारंभी येथील खासगी रुग्णालयात व त्यानंतर औरंगाबाद येथे उपचारार्थ नेत असताना रस्त्यातच त्याची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी शे.नासिर शे.गणी वय ५० यांनी चिखली पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतक शे.अलीम शे.सलीम याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन वर्षांची मुलगी व अवघ्या सहा महिन्यांचा एक मुलगा तसेच एक भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. 

दुचाकी अपघातात दोन ठार अंढेरा : दुचाकी अपघातात दोन जण ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना २६ एप्रिल रोजी रात्री आठ वाजता मलकापूर- अंढेरा मार्गावरील शिवणी अरमाळ नजीक घडली.पिंपळवाडी येथील भाजपचे पदाधिकारी नामदेव गालट हे पत्नीसह पाडळी शिंदे येथून नानमुखाचा कार्यक्रम आटोपून घरी जात होते. दरम्यान शिवणी अरमाळ नजीक त्यांच्या दुचाकी (क्र. एम. एच. २८ एल. ४३४९ ) ला समोरुन येणाºया दुचाकी क्र.( एम. एच. २८ टी. ३७१७) ने धडक दिली. या अपघातात नामदेव गालट व विजय जाधव गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी नेत असताना दोघांचाही रस्त्यातच मृत्यू झाला. 

टॅग्स :ChikhliचिखलीAccidentअपघात