चिखली भाजपकडून संजय गायकवाड यांच्या पुतळ्याचे दहन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:35 IST2021-04-20T04:35:58+5:302021-04-20T04:35:58+5:30

आमदार संजय गायकवाड यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी शिवराळ व असंवैधानिक भाषेचा वापर केला असल्याचा आरोप करीत चिखली ...

Chikhali BJP burns Sanjay Gaikwad's statue! | चिखली भाजपकडून संजय गायकवाड यांच्या पुतळ्याचे दहन !

चिखली भाजपकडून संजय गायकवाड यांच्या पुतळ्याचे दहन !

आमदार संजय गायकवाड यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी शिवराळ व असंवैधानिक भाषेचा वापर केला असल्याचा आरोप करीत चिखली भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी १८ एप्रिल रोजी स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमदार गायकवाड यांचा पुतळा जाळून तीव्र रोष व्यक्त केला. यावेळी शहराध्यक्ष पंडितराव देशमुख, तालुकाध्यक्ष डॉ. कृष्णकुमार सपकाळ, पं. स. सभापती सिंधू तायडे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष संतोष काळे पाटील, शहराध्यक्ष सुदर्शन खरात, नगरसेवक गोविंद देव्हडे, सुहास शेटे, सुभाष झडगे, अनुप महाजन, हरिभाऊ परिहार, सागर पुरोहित, युवराज भुसारी, भारत दानवे, महेश लोणकर, संजय अतार, दानवे, सिद्धेश्वर ठेंग, दिलीप डागा, किशोर जामदार, विकी शिनगारे, अ‍ॅड. संजीव सदार, सादिक काझी, नरेंद्र मोरवाल, अनमोल ढोरे, सचिन कोकाटे, शंकर देशमाने, सचिन कुलवंत, शंकर उद्रकर आदी उपस्थित होते.

Web Title: Chikhali BJP burns Sanjay Gaikwad's statue!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.