मोताळा नगराध्यक्षांनी दिला राजीनामा
By Admin | Updated: March 24, 2017 01:41 IST2017-03-24T01:41:01+5:302017-03-24T01:41:01+5:30
मोताळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष माधुरी पुरुषोत्तम देशमुख यांनी पदाचा राजीनामा दिला.

मोताळा नगराध्यक्षांनी दिला राजीनामा
मोताळा, दि.२३- नगरपंचायतीच्या प्रथम नगराध्यक्ष माधुरी पुरुषोत्तम देशमुख यांनी आज अपर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्याकडे नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. माधुरी देशमुख यांनी जवळपास एक वर्ष चार महिने नगरपंचायतीचा कारभार सांभाळून पक्ष नेतृत्वाचा विश्वास सार्थ ठरविला. सव्वा वर्षाची यशस्वी कारकीर्द झाल्यावर पक्ष स्तरावर ठरल्याप्रमाणे त्यांनी गुरुवारी अपर जिल्हाधिकारी यांच्याकडे आपला नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. नगराध्यक्ष देशमुख यांनी राजीनामा दिल्यामुळे पुढील नगराध्यक्ष कोण? याबाबत शहरवासीयांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आगामी नगराध्यक्ष शहराचा सर्वांगीण विकास करणारा हवा, अशी अपेक्षा व्यक्त केल्या जात आहे.