आत्महत्याग्रस्त कुटुंबांना धनादेशाचे वाटप
By Admin | Updated: July 9, 2016 00:19 IST2016-07-09T00:19:34+5:302016-07-09T00:19:34+5:30
सिंदखेडराजा तालुक्यातील दोन शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबासह नैसर्गिक आपत्तीत नुकसानग्रस्ताना मदतीचे वाटप.

आत्महत्याग्रस्त कुटुंबांना धनादेशाचे वाटप
सिंदखेडराजा (जि. बुलडाणा) : निसर्गाची अवकृपा, शासनाची उदासीनता या दृष्टचक्रात अडकलेला शेतकरी मग गळ्याला फास आवळून आपली जिवनयात्रा संपवितो, अशावेळी त्याच्या पश्चात त्याच्या कुटंबांचा आधारच नाहीसा होतो. या कुटुंबाला सावरण्यासाठी शासन अशा आत्महत्याग्रस्त कुटंबांला आर्थिक मदत करते, याशिवाय नैसर्गीक आपत्तीत नुकसान झालेल्या शेतकरी कुटुंबांना सुध्दा शासनाच्या वतीने आर्थिक मदत केल्या जाते. सिंदखेडराजा तालुक्यातील कुटुंबांना आ. डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका कार्यक्रमात उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्याळ, तहसीलदार आर.यु. सुरडकर, विठलराव ईलग यांच्या प्रमुख उपस्थितीत धनादेशाचे वाटप करण्या त आले.
तालुक्यातील गुंज व साठेगाव येथील मदन तुपकर व संतोष नागरे या दोन शेतकर्यांनी आत्महत्या केली होती. त्यांच्या वारसांना प्र त्येकी ३१ हजार रूपयाचे धनादेश करण्यात आले. तसेच ६९ हजार रूपयाची रक्कम त्यांच्या पोष्ट खात्यात रक्कम जमा करण्यात आली. तसेच नैसर्गीक आपत्तीत सापडलेल्या नऊ कुटुंबांना २१ हजार रू पया पासून तर ३0 हजार रूपया पर्यतच्या रकमेचे धनादेश वाटप करण्यात आले. दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील कर्त्या पुरूषाचे निधन झालेल्या ३२ लाभार्थ्यांच्या कुटुंबाला प्रत्येकी २0 हजार रू पयाचे धनादेश आ. डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.