डाेणगाव ग्रामपंचायतच्या कारभाराची चाैकशी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:23 IST2021-06-24T04:23:44+5:302021-06-24T04:23:44+5:30
डोणगाव : ग्रामपंचायतच्या संपूर्ण कारभाराची खातेनिहाय चौकशी इतर जिल्ह्यातील विभागामार्फत करून दोषींवर गुन्हे दाखल करून निलंबनाची कारवाई करावी, अशी ...

डाेणगाव ग्रामपंचायतच्या कारभाराची चाैकशी करा
डोणगाव : ग्रामपंचायतच्या संपूर्ण कारभाराची खातेनिहाय चौकशी इतर जिल्ह्यातील विभागामार्फत करून दोषींवर गुन्हे दाखल करून निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी हसनशेरखाँ महंमदखाँ व शेख आयूब शेख गुलाब मुल्लाजी यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे़
डोणगाव येथे ग्रामपंचायतमध्ये सचिव ज्ञानेश्वर चनखोरे हे डिसेंबर २०१९ मध्ये रुजू झाल्यापासून मनमानी कारभार करीत त्यांच्या कारकिर्दीत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे़ त्यांची इतर जिल्ह्यातील विभागामार्फत संपूर्ण चौकशी करून तत्काळ कारवाई करून गुन्हे दाखल करून निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी डोणगाव येथील हसनशेरखाँ महंमदखाँ व शेख आयूब शेख गुलाब मुल्लाजी यांनी निवेदनात केली आहे़ सचिव ज्ञानेश्वर चनखोरे यांनी १४ व्या वित्त आयोगाचा निधी आराखड्यानुसार खर्च केला नाही़ तसेच यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगीही घेतली नाही़ त्यांची खातेनिहाय चौकशी करावी, तसेच १४ व्या वित्त आयोगांतर्गत कोरोना काळात ग्रामपंचायत भवनाचे सुशोभीकरण करण्यात आले़ त्यावर अंदाजे ५० लाख रुपये खर्च करण्यात आले़ ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता निधी खर्च केल्याचा आराेप निवेदनात करण्यात आला आहे़ ग्रामपंचायतच्या कारभाराची चाैकशी करून दाेषींवर कारवाई करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे़
ग्रामपंचायतीने केलेला सर्व खर्च हा त्यावेळी असलेल्या सदस्यांना विश्वासात घेऊनच केलेला आहे. यामध्ये गावाची निकड लक्षात घेता व खर्च करण्याची वेळेची मर्यादा बघता नियमानुसार सर्व खर्च करण्यात आलेला आहे. तसेच गावातील गट नंबर १३१ व १२३ या गटावर कोणतेही अनधिकृत बांधकाम किंवा अतिक्रमित बांधकाम सुरु नाही. ग्रामपंचायतच्या हद्दीत जी काही बांधकाम केली असतील ती पहिलेच आहेत. ग्रामपंचायतीने त्यांना नोटीस देऊन काढून टाकण्यासाठी सुधा सांगितलेले आहे.
ज्ञानेश्वर चनखोरे, ग्रामविकास अधिकारी डोणगाव