‘त्या’ स्वस्त धान्य दुकानदाराला अटक
By Admin | Updated: December 9, 2014 00:00 IST2014-12-09T00:00:39+5:302014-12-09T00:00:39+5:30
स्वस्त धान्य दुकानदारावर अन्न व पुरवठा जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत गुन्हा दाखल.
_ns.jpg)
‘त्या’ स्वस्त धान्य दुकानदाराला अटक
लोणार (बुलडाणा): स्वस्त धान्याची काळ्या बाजारात विक्री केल्यानंतर तहसीलदारांच्या तक्रारीवरून पहुर येथील स्वस्त धान्य दुकानदारावर अन्न व पुरवठा जीवनावश्यक वस्तू कायद्यां तर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर अटकपूर्व जामिनासाठी दाखल अर्ज न्यायालयाने खारीज केल्यामुळे स्वस्त धान्य दुकानदार मुंढे यांनी सोमवार, ८ डिसेंबरला पोलीस ठाण्यात स्व त:ला अटक करून घेतली.
स्थानिक शासकीय गोदामातून पहूर येथील स्वस्त धान्य दुकानदार आर. एस. मुंढे यांनी ११ नोव्हेंबर रोजी रेशनचे २५ क्विंटल गहू, १९ क्विंटल तांदूळ व २ क्विंटल साखर असा एकूण ४६ क्विंटल धान्यमाल एम.एच.0४ ए.जी.८४ क्रमांकाच्या ४0७ वाहनात वाटपासाठी उचल केला होता. सदर धान्य गावात न नेता, त्यांनी या धान्याची काळ्याबाजारात विक्री करून शासकीय धान्याची अफरातफर केली. घटनेची माहिती कळताच जिल्हा पुरवठा अधिकारी भराडी आणि पुरवठा निरीक्षक पिंपरकर यांनी पहुर येथे जाऊन मुंढे यांच्या दुकानाची पाहणी केली. त्यामध्ये त्यांना वाटपासाठी उचल केलेले धान्य आढळून न आल्याने तसेच गावात केलेल्या चौकशीच्या आधारे स्वस्त धान्याची अफरातफर झाल्याचे निदर्शनास आले. यावेळी कारवाईच्या भीतीपोटी सदर स्वस्त धान्य दुकानदार फरार झाला होता.
जिल्हा पुरवठा अधिकारी भराडी यांनी तहसीलदार अपार यांना सदर दुकानदारावर अन्नपुरवठा जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर तहसीलदार अपार यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून स्वस्त धान्य दुकानदार मुंढे यांच्यावर कलम ३, ७ इ.सी.अँक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात सादर केलेला अर्ज मंजूर न झाल्यामुळे घटनेच्या तब्बल २८ दिवसानंतर स्वस्त धान्य दुकानदार हे स्व त:हून पोलीस ठाण्यात दाखल झाले आणि स्वत:ला अटक करून घेतली.